Corona in USA | अमेरिकेत पुन्हा कोरोनाचा धुमाकूळ... भारतीयांनो सावधान! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

america corona

अमेरिकेत पुन्हा कोरोनाचा धुमाकूळ... भारतीयांनो सावधान!

अमेरिकेत कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा आपले पाय पसरवायला सुरुवात केली आहे. लस उपलब्ध झाल्यानंतरही पुन्हा एकदा रुग्णालयांकडे कोरोना पेशंट्सचा ओढा वाढत आहे. यूएस डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड ह्युमन सर्व्हिसेसच्या आकडेवारीनुसार, देशाच्या अनेक भागांमध्ये कोविड-19 च्या केसेस झपाट्याने वाढत आहेत. हे प्रमाण गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरप्रमाणेच आहे.

ब्लूमबर्गने यासंर्भात सविस्तर माहिती दिली आहे. अमेरिकेच्या 15 राज्यांमध्ये वर्षभरापूर्वी लागणाऱ्या ICU बेड्लपेक्षा यंदा जास्त बेड्सची गरज असल्याचं आढळून आलंय. कोलोरॅडो, मिनेसोटा आणि मिशिगन या राज्यांमध्ये आयसीयु बेड्सच्या गरजेची वाढलेली संख्या अनुक्रमे 41, 37 आणि 34 टक्के आहे.

मिशिगनमध्ये दरडोई सर्वाधिक प्रकरणे नोंदवली जात आहेत. मात्र, राज्यात अद्याप कोणतेही निर्बंध जारी करण्यात आलेले नाहीत. राज्यातील प्रशासन प्रत्येकाला मास्क घालण्यासाठी आणि लसीकरण करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशनचे प्राध्यापक अली मोकदाद म्हणाले, "आमचे बरेच डॉक्टर सतत रुग्णालयात असतात. आयसीयू, इमर्जन्सी आणि हॉस्पिटलमध्ये, ज्या ठिकाणी आजपर्यंत लसीकरण झाले नाही, अशा व्यक्तीचे मृत्यू वाढल्याचं पाहायला मिळतंय.

इतर रुग्णांना बेड मिळत नाहीत

कोरोना रुग्णांसाठी आयसीयू बेड्सची गरज असल्याने इतर आजारांनी त्रस्त रुग्णांना बेड मिळू शकत नाहीत. जे त्यांच्यासाठी अधिक धोकादायक आहे. दोन महिन्यांपासून कोरोना संसर्गाची प्रकरणे कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा वाढ नोंदवली जात आहे.कोरोनाच्या डेल्टा प्रकारामुळे हे प्रकरणही समोर येत आहे. थंडीमुळे लोक घरात असल्याचे सांगण्यात आलं. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, लसींपासून संरक्षण कमी होत आहे, त्यामुळे या हिवाळ्यात साथीच्या आजाराच्या आणखी एका मोठ्या लाटेचा सामना करावा लागू शकतो.

'बूस्टर डोस'चं संजीवनी

दुसरीकडे, कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये, अमेरिकन आरोग्य संस्था पुन्हा एकदा लोकांना लशीचा बूस्टर डोस देण्याचा विचार करत आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या आरोग्य संस्थांनी अँटी-कोरोना लसींचा बूस्टर डोस लागू करण्यास परवानगी दिली आहे.

loading image
go to top