पृथ्वीच्या चुंबकीय आवरणाला तडा

पीटीआय
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

भारतातील प्रयोगशाळेने नोंदविले निरीक्षण; वैश्‍विक किरणांचा स्फोट कारणीभूत
वॉशिंग्टन / पुणे - जगातील सर्वांत मोठ्या आणि अतिसंवेदनशील वैश्‍विक किरण प्रयोगशाळेने आकाशगंगेतील वैश्‍विक किरणांच्या स्फोटाची नोंद केली आहे. पृथ्वीच्या चुंबकीय आवरणात यामुळे मोठा तडा गेल्याचे निदर्शनास आल्याचे निरीक्षण शास्त्रज्ञांनी नोंदविले आहे.

सूर्याच्या पृष्ठभागावरून निघालेला प्लाझ्मांचा मोठा ढग अतिशय वेगाने पृथ्वीवर आदळला. यामुळे पृथ्वीच्या चुंबकीय आवरणावर मोठ्या प्रमाणात दाब तयार होऊन भूचुंबकीय वादळ निर्माण झाले. तमिळनाडूमधील उटी येथील "टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च'च्या वैश्‍विक किरण प्रयोगशाळेत "ग्रेप्स-3' ही म्युऑन दुर्बीण आहे. या दुर्बिणीने गेल्या वर्षी वैश्‍विक किरणांचा 20 गिगा इलेक्‍ट्रॉन व्होल्टचा तब्बल दोन तास मोठा स्फोट झाल्याचे निरीक्षण नोंदविले.

सूर्याच्या पृष्ठभागावरून निघालेला प्लाझ्मांचा मोठा ढग 25 लाख किलोमीटर प्रतितास वेगाने पृथ्वीवर आदळला. यामुळे पृथ्वीच्या चुंबकीय आवरणावर मोठ्या प्रमाणात दाब निर्माण झाला. या दाबाने भूचुंबकीय वादळ निर्माण झाले. या वादळामुळे समुद्रसपाटीपासून उंचावरील देशांमध्ये रेडिओ संदेश बंद पडले. हे संशोधन या आठवड्यातील "फिजिक्‍स रिव्ह्यू लेटर्स'मध्ये प्रकाशित झाले आहे.

जीवसृष्टीचे संरक्षक कवच
पृथ्वीचे चुंबकीय आवरण हे दहा लाख किलोमीटर व्यासाचे आहे. यामुळे पहिल्या टप्प्यावर पृथ्वीचे सौर, तसेच मोठ्या वैश्‍विक किरणांपासून संरक्षण होते. यामुळे अतितीव्र किरणोत्सारापासून पृथ्वीवरील जीवसृष्टीचे संरक्षण होते. सौर वादळामुळे मोठे वीज प्रकल्प बंद पडणे, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम (जीपीएस) बंद आणि उपग्रह यंत्रणा आणि संदेशवहन बंद होऊ शकते.

Web Title: Crack in the earth's magnetic layer