
Crime Story : विकृतीचा कळस! १५ वर्षांचा कट, शिक्षिकेचे अपहरण, ५३ दिवस घेतला बदला...
Crime Story : माणसाची विकृती आणि बदल्याची भावना ही जगात कुठेही, कोणत्याही जाती-धर्माच्या माणसात सापडू शकते. त्याला कशाचं बंधन नसतं हेच खरं. अशीच एक विकृतीची ओळख करून देणारी घटना सध्या व्हायरल होत आहे. घटना तशी जूनी १९६०-७० च्या दशकातली आहे. अमेरिकेत मिनीसोटा इथे एक शिक्षिका राहत होती. तिचं लग्न झालं. त्यांना दोन मुले झाली. एक मुलगा आणि एक मुलगी.
हा एक कट्टर इसाइ परिवार होता. यांचा पुजापाठ वर फार विश्वास होता. त्यानिमित्ताने ते कायम फिलीपीन्स येत जात राहत. एकदा १९८०मध्ये नेहमीप्रमाणे ते फिलीपीन्स जाण्याची तयारी करत होते. ज्या दिवशी त्यांना निघायचं होतं त्याच्या ४ दिवस आधी शिक्षिका आपली ८ वर्षांच्या मुलीला घेऊन सलूनमध्ये गेली होती. परत येताना गाडी कडे जात असतानाच कोणीतरी मागे गन लावली आणि सांगेल तसे चालत रहा म्हणून सुचना दिली.
त्या माणसाने त्यांना गाडीकडे नेलं. बंदुकीच्या टोकावर त्यांना गाडीत बसवलं. त्याच्या इशाऱ्यावर आणि बंदुकीच्या धाकावर तो सांगेल तशी गाडी चालवत होती. पुढे पोलीस बंदोबस्त होता. तिला वाटलं आपण सुटू पण तसं घडलं नाही. त्या आधीच त्याने गाडी वळवायला लावली.
पुढे जाऊन त्याने दोघींना उतरवलं. दुसऱ्या गाडीच्या डिग्गीत बसायला लावल. डिग्गी फारच लहान होती. दोघी बसणे शक्य नव्हतं तरी त्याने दोघींना कोंबून त्यांच्या तोंडाला डॉक्टर टेप लावून दिला. तिथे जवळच दोन लहान मुलं खेळत होते. त्यातल्या एकाने हे काय करताय म्हणून विचारलंही. तर त्याने त्या मुलालाही या मायलेकी सोबत डिग्गीत कोंबलं.
त्यानंतर थोडं अंतर पुढे जाउन गाडी थांबवली. त्या मुलाला घेऊन कुठेतरी गेला आणि पुन्हा गाडीत येउन बसला आणि गाडी चावलू लागला. त्या शिक्षिका आणि तिच्या मुलीला घेऊन तो त्याच्या घरी गेला. तो त्यांना घेऊन एका खोलीत गेला. तिथे दोन कपाट बनवलेले होते. त्यांने पहिले शिक्षिका आणि नंतर मुलीला लोखंडी साखळ्यांनी बांधलं आणि दोघींना वेगवेगळ्या कपाटात डांबलं. हे कपाट म्हणजे त्या तिथे फक्त उभ्या राहू शकत होत्या. जराही हलूसुद्धा शकत नव्हत्या.
त्या दोघींसाठी त्याने काही नियम बनवले होते. या दोघींना आयुष्यभर आता इथेच रहावं लागणार. फक्त एक वेळ जेवायला मिळेल, आठवड्यातून एकदाच आंघोळ करता येईल. रात्र कपाटात उभ्यानेच काढावी लागेल, असं सगळं ऐकून त्या दोघी घाबरून गेल्या. पण इच्छा असूनही त्या काहीही करू शकत नव्हत्या.
किडनॅपर तिचा विद्यार्थी होता
त्याने कॅमेरा लावून दोघींना कॅमेरा समोर उभ केलं. आणि शिक्षिकेला विचारलं मला ओळखलं का. त्यावर नकार दिल्यावर त्याने सांगितलं की, तू माझी शिक्षिका होती. ९ वीच्या वर्गात गणित शिकवत होती. गणितात त्याला बी ग्रेड दिली. ज्यामुळे त्याला कोणत्याही चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नाही आणि नोकरीही मिळाली नाही. शिवाय त्याला इच्छा नसतानाही ताईवान सेनेत सहभागी व्हावं लागलं.
१५ वर्ष बदल्याची वाट बघत होता
तो जेव्हा १४ वर्षांचा होता तेव्हा शिक्षिका २० वर्षांची हेती. त्याला तिने ओळखलं नाही म्हणून त्याने तिला फोटोही दाखवला ज्यात तो आणि शिक्षिका दोघे होते. त्याने बदला घेण्यासाठी १५ वर्ष वाट बघितल्याचं सांगितलं. त्यासाठी त्याने फार तयारी केल्याचंही सांगितलं.
रोज करायचा अत्याचार
हे सगळं सांगितल्यावर त्याने शिक्षिकेला कॅमेऱ्यासमोर कपडे काढायला सांगितले. काही इलाजच नसल्याने शिक्षिकेने नाइलाजास्तव त्याचं ऐकलं. तो अनैसर्गिकरित्या तिच्यावर अत्याचार करायचा. हे वारंवार घडायला लागंल. हताश शिक्षिकेने यातून आपली सुटका नाही मानून आशा सोडली होती. तो आपल्या मुलीलाही मारण्याची धमकी देत असल्याने घाबरून ती नीपूटपणे त्याचं ऐकत होती.
अशी झाली सुटका
काही दिवसांनी जेव्हा तो विद्यार्थी कामानिमित्त बाहेर गेला होता तेव्हा शिक्षिकेला आपली साखळी थोडी सैल असल्याचं जाणवलं. तिने कशीबशी त्यातून आपली सुटका करून घेतली आणि पोलीसांना सुचना दिली. त्याठीकाणी पोलीसांनी येऊन त्यांची सुटका केली.
या सत्य घटनेवर Abducted: The Mary Stauffer Story नावाचा सिनेमाही निघाला होता.
आज तकने दिलेल्या बातमीनुसार पोलीस तपासात विद्यार्थ्याने केले धक्कादायक खुलासे
त्या अपराधी विद्यार्थ्याला अटक केल्यावर कोर्टात सादर केलं.
ज्या लहान मुलाने त्यांना बघितलं होतं त्याला त्याने आधीच मारून टाकलं होतं.
९ वी मध्ये असताना त्याला या शिक्षिकेविषयी आकर्षण वाटत होतं.
पण बी ग्रेड दिलं म्हणून प्रेमाचं रागात रुपांतर झालं.
त्यानंतर बदला घेण्याचं प्लॅनिंग सुरू झालं.
यासाठी १५ वर्ष लागलीत.
त्याने कोर्टातही शिक्षिकेवर प्राणघातक हल्ला केला होता.