रोज दोन किलो शिव्या खातो..म्हणूनच मी 'फिट' आहे : पंतप्रधान मोदी 

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 एप्रिल 2018

लंडन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'फिटनेस'विषयी समर्थक आणि विरोधक या दोघांनाही उत्सुकता असते.. त्यांच्या या 'फिटनेस'चं रहस्य काय, असा थेट प्रश्‍न लंडनमध्ये एका प्रेक्षकाने विचारला आणि त्यावर पंतप्रधान मोदी यांनी उत्तर दिले.."गेल्या 20 वर्षांपासून मी रोज एक-दोन किलो शिव्या खातोय..!' या त्यांच्या उत्तरावर संपूर्ण प्रेक्षागृहात 'मोदी..मोदी' घोषणा देण्यास सुरवात झाली.. 

ब्रिटनच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदी यांनी काल (बुधवार) रात्री अनिवासी भारतीयांशी संवाद साधला. कवी आणि सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी पंतप्रधान मोदी यांची मुलाखत घेतली. दोन तास चाललेल्या या कार्यक्रमात मोदी यांनी प्रेक्षकांच्या काही प्रश्‍नांनाही दिलखुलास उत्तरे दिली. 

या कार्यक्रमापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांची बकिंगहॅम पॅलेसमध्ये भेट घेतली. यावेळी ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. 

मोदींची मुलाखत..! 

  • तुमच्या पासपोर्टची 'ताकद' वाढल्याचे तुम्हाला जाणवत असेल. जगभरातील लोक आता भारतीयांकडे आदराने पाहतात. 
  • माल्टामधील राष्ट्रकुल शिखर परिषदेला मी जाऊ शकलो नाही. यावेळी युवराज चार्ल्स यांनी स्वत: मला आमंत्रण दिले आणि येण्याचा आग्रह केला. 
  • इतिहासाच्या पुस्तकात दखल घेतली जावी, यासाठी मी काम करत नाही. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे.. आपल्या देशाची आठवण ठेवा, मोदीची नाही! मी तुमच्यासारखाच एक सर्वसामान्य भारतीय आहे. 
  • यापूर्वी मानवतावादी कार्यांची चर्चा करताना जग फक्त पाश्‍चिमात्य देशांविषयीच बोलत असे. पण येमेनमधून पाच-सहा हजार भारतीयांना सुखरूप परत आणल्यानंतर इतरही अनेक देशांनी येमेनमधून त्यांच्या नागरिकांना परत आणण्यासाठी भारताला विनंती केली. 
  • म्यानमारमध्ये रोहिंग्यांची समस्या निर्माण झाली, तेव्हा जगाने त्यांच्या सोयीची भूमिका घेतली. पण बांगलादेशमध्ये आश्रयासाठी आलेल्या रोहिंग्यांसाठी भारताने अन्न पुरवठा करण्यासाठी मदत केली. 
  • बलात्कार हा बलात्कारच असतो.. आमच्या सरकारच्या कालावधीत असो वा त्यांच्या सरकारच्या कालावधीत! देशाच्या मुलींवर होणारे अत्याचार आपण सहन कसे करू शकतो? 
Web Title: Criticism is the secret of my fitness, says Narendra Modi