Elon Musk : माझ्यावर टीका करा पण...; पत्रकारांची अकाऊंट बंद करत मस्कने दाखवले रंग

या सगळ्या पत्रकारांनी गेल्या काही महिन्यांमध्ये इलॉन मस्क आणि त्याच्या येण्याने ट्विटरमध्ये झालेले बदल याविषयी लिहिलं होतं.
Elon Musk
Elon MuskSakal

इलॉन मस्कने ट्विटर खरेदी केल्यापासून दररोज काही ना काही घडामोडी घडत आहेतच. आता ट्विटरने काही पत्रकारांची अकाऊंट्स सस्पेंड केली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ट्विटर चर्चेत आलं आहे.

यामध्ये न्यूयॉर्क टाईम्स आणि वॉशिंग्टन पोस्ट्सच्या काही पत्रकारांचा समावेश आहे. अजूनही हे अकाऊंट सस्पेंड करण्यामागचं कारण लक्षात आलेलं नाही. या सगळ्या पत्रकारांनी गेल्या काही महिन्यांमध्ये इलॉन मस्क आणि त्याच्या येण्याने ट्विटरमध्ये झालेले बदल याविषयी लिहिलं होतं.

याविषयी स्पष्टीकरण देताना इलॉन मस्कने सांगितलं, इतरांना जे नियम लागू होतात तेच नियम या पत्रकारांनाही लागू करण्यात आले आहेत. मला दिवसभर माझ्यावर टीका करत राहणं ठीक आहे. पण माझी वैयक्तिक माहिती सार्वजनिक करणे, तसंच माझ्या परिवाराला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हे चुकीचं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com