बापरे.... अजगराने गिळली चक्क मगर

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 जून 2019

ऑस्ट्रेलियातील मगर आणि अजगराच्या लढतीची छायाचित्रे अंगावर काटा आणणारी आहेत.

सिडनी (ऑस्ट्रेलिया): मगर मोठ-मोठ्या प्राण्यांना क्षणात गतप्राण असून, ताकदवान मगरीपढे अनेक प्राणी हतबल होताना दिसतात. मात्र, एका अजगराने चक्क मगर गिळल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे.

ऑस्ट्रेलियातील मगर आणि अजगराच्या लढतीची छायाचित्रे अंगावर काटा आणणारी आहेत. सोशल मीडियासाठी प्रसिद्ध असलेल्या फेसबुकवर GGwildliferescueinc या खात्यावरून ही छायाचित्रे शेअर करण्यात आली आहेत. या छायाचित्रांमध्ये अजगर मगरीला गिळत असल्याचे दिसत आहे. ही छायाचित्रे पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. ऑस्ट्रेलियातील दुसऱ्या मोठ्या ओलिव पाइथनचे फोटो आहेत. मगर आणि अजगराच्या या लढाईचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अजगर किंवा मगरीच्या तावडीत कोणी सापडले तर त्याचा मृत्यू ठरलेलाच असतो. पण या दोन प्राण्यांमध्ये वाद झाला अन् अजगराने लढाई जिंकली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crocodile and python fights photos viral social media