"क्रायोजेनिक'ची चाचणी यशस्वी 

पीटीआय
शनिवार, 28 जानेवारी 2017

बंगळूर :  "जीएसएलव्ही एमके 3' या रॉकेटच्या उड्डाणाच्या तयारीतील मोठा टप्पा पार पाडताना भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) स्वदेशी बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनची यशस्वी चाचणी घेतली. या रॉकेटच्या पुढील तीन महिन्यांत चाचणी घेण्याचे नियोजन आहे. प्रक्षेपकाला सर्वाधिक वेग देत असल्याने क्रायोजेनिक इंजिनचा वापर प्रक्षेपणाच्या अखेरच्या टप्प्यात केला जातो. या इंजिनची 25 जानेवारीला तमिळनाडूतील महेंद्रगिरी येथील प्रक्षेपण केंद्रावर पन्नास सेकंदासाठी चाचणी घेण्यात आली. ही चाचणी अपेक्षेप्रमाणे झाली. याच इंजिनची दुसरी आणि अखेरची चाचणी लवकरच घेतली जाणार असून, ती 640 सेकंदांची असेल. 

Web Title: cryonics test success