...तिच्या डोळ्यातून अश्रुंऐवजी येतात क्रिस्टल!

मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

अर्मेनिया या देशातील एका २२ वर्षीय महिलेच्या डोळ्यातून अश्रुंऐवजी रोज ५० क्रिस्टल (स्फटिक) बाहेर पडत असल्याचे समोर आले आहे. काजेरियन असे या महिलेचे नाव, तिच्या डोळ्यातून अश्रुंऐवजी क्रिस्टल येत असल्याचे पाहून डॉक्टरही अचंबित झाले आहेत.

नवी दिल्ली : सोव्हियत रशियापासून वेगळा होऊन निर्माण झालेल्या अर्मेनिया या देशातील एका २२ वर्षीय महिलेच्या डोळ्यातून अश्रुंऐवजी रोज ५० क्रिस्टल (स्फटिक) बाहेर पडत असल्याचे समोर आले आहे. काजेरियन असे या महिलेचे नाव, तिच्या डोळ्यातून अश्रुंऐवजी क्रिस्टल येत असल्याचे पाहून डॉक्टरही अचंबित झाले आहेत. त्यामुळे डोळ्यात क्रिस्टल कसे तयार होत असावेत. याबाबत डॉक्टर अधिक तपासणी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, डोळ्यात जळजळ होत असल्याने ती एकदा डॉक्टरांकडे गेली होती. त्यावेळी तिच्या डोळ्यातून क्रिस्टल पडत बाहेर असल्याचे निदान झाले. सुरुवातीला घेतलेल्या औषधांनी तिला यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र, पुन्हा या क्रिस्टल अश्रूंमुळे तिला मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. काजेरियनच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर असल्याने महागडा इलाज करणे तिला शक्य नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत जगणे मुश्किल झाले असल्याचे तिचे म्हणणे आहे.

डॉक्टरही अचंबित!
डॉक्टरही कायजेरियनच्या या आजाराबाबत अनभिज्ञ आहेत. तिने ग्लासात जमा केलेले आपले क्रिस्टल डॉक्टरांना दाखवले तेव्हा त्यांना विश्वास बसेना. कारण त्यांनी अशी केस कधीच पाहिलेली नव्हती. मिळालेल्या माहितीनुसार, एका डॉक्टरने तर काजेरियनला खोटे ठरवत रुग्णालयातून हाकलून लावले. मात्र, त्यावेळी रडल्याने तिच्या डोळ्यातून बाहेर पडणारे क्रिस्टल हे नैसर्गिक असल्याचे त्या डॉक्टरने मान्य केले. तिचे हे क्रिस्टल अनेक नेत्ररोग तज्ज्ञांकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले. मात्र, ते यावर कोणताही उपाय करू शकले नाही. त्यामुळे तिला उपचारासाठी अन्य डॉक्टरांकडे पाठवण्यात आले. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने कुटुंबीय तिच्यावर अद्याप उपचार करू शकले नाही. अर्मेनियाच्या आरोग्य मंत्रालयाने ही या दुर्मिळ प्रकाराची दखल घेतली असून, याबाबत सल्लागारांच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. 

अत्यंत दुर्मिळ प्रकार
याबाबत रशियन नेत्ररोग तज्ञांनी म्हटले आहे की, हा अत्यंत दुर्मिळ प्रकार असून, त्याचे निदान करणे खूप कठीण आहे. मानवी अश्रूंमध्ये प्रथिने, चरबी आणि काही सूक्ष्म घटक असतात. जर त्यात मीठाचे प्रमाण वाढले तर ते क्रिस्टलमध्ये रूपांतरित होतात. अश्रूंमध्ये प्रथिने जास्त असणे हे देखील यामागील एक कारण असू शकते.