फिडेल कॅस्ट्रोंच्या नेतृत्वाखाली क्‍यूबाची मोठी प्रगती : भारत

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

न्यूयॉर्क : क्‍यूबाचे नेते फिडेल कॅस्ट्रो यांच्या नेतृत्वाखाली क्‍यूबाने शिक्षण आणि आरोग्य सेवा आदी क्षेत्रांमध्ये मोठी प्रगती केली असल्याचे सांगत संयुक्त राष्ट्रांमधील (यूएन) विशेष बैठकीत भारतातर्फे कॅस्ट्रो यांना अभिवादन करण्यात आले.

अनेक देशांचा दबाव झुगारत क्‍यूबाच्या नागरिकांनी फिडेल कॅस्ट्रो यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण, आरोग्य सेवा अशा अनेक क्षेत्रांत चांगली कामगिरी केली आहे, अशा शब्दांत भारताचे "यूएन'मधील कायमस्वरूपी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी कॅस्ट्रोंना श्रद्धांजली अर्पण केली. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये आर्थिक समानता आणि सामाजिक न्याय यांना प्राधान्य देण्याची मागणी करत त्यासाठी भारत आणि क्‍यूबाने अनेक वर्षे काम केले आहे, असे ते म्हणाले. या बैठकीवेळी दिवंगत फिडेल कॅस्ट्रो यांना सुमारे 30 देशांच्या प्रतिनिधींनी श्रद्धांजली अर्पण केली.
 
Web Title: cuba developed under fidel castro