Mocha Cyclone: चक्रीवादळ मोचामुळे म्यानमारमध्ये १४५ जणांचा मृत्यू; लाखों इमारतींचं मोठ्या प्रमाणावर नुकसान

मोचा चक्रीवादळामुळे झालेल्या संपूर्ण जीवितहानीची आणि वित्तहानीची माहिती समजू शकलेली नाही
Mocha Cyclone
Mocha CycloneEsakal

मोचा चक्रीवादळामुळे म्यानमारमध्ये १४५ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. १ लाख ८५ हजारांहून अधिक इमारतींचं नुकसान झालं आहे. ‘एमआरटीव्ही’ या सरकारी दूरचित्रवाणीने काल (शुक्रवारी) याबाबतची माहिती दिली आहे.

मृतांचा हा आकडा फक्त राखीन प्रांतातील आहे. या प्रांताला मोचा चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे. देशाच्या इतर भागांनाही मोचाचा फटका बसल्याचं दिसून येत आहे. त्याचबरोबर, . दरम्यान, मोचा चक्रीवादळामुळे झालेल्या संपूर्ण जीवितहानीची आणि वित्तहानीची माहिती समजू शकलेली नाही.

Mocha Cyclone
Devendra Fadnavis: मोठी बातमी! भाजपमध्ये रात्रीची खलबतं सुरू; देवेंद्र फडणवीसांची रातोरात दिल्ली वारी

सरकारने वादळामुळे ४०० हून अधिक मृत्यूचा दावा करणारी आकडेवारी खोटी असल्याचे म्हटले आहे. तर सतर्क राहण्याचे आवाहन ही प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे.

पर्यटकांना समुद्राजवळ जाण्यास मनाई

लोकांनी समुद्राजवळ जाऊ नये यासाठी पोलीस आणि प्रशासन वारंवार लोकांना आवाहन करत आहे. गावागांवात लाऊडस्पीकरचा वापर करुन सातत्याने प्रशासनाकडून लोकांना माहिती दिली जात आहे.

Mocha Cyclone
Monsoon Update : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अंदमानात 3 दिवस आधीच मान्सून धडकला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com