दलाई लामांना अरुणाचलमध्ये प्रवेश नको; अन्यथा.. : चीन

वृत्तसंस्था
शुक्रवार, 3 मार्च 2017

बीजिंग :'दलाई लामा यांना अरुणाचल प्रदेशमध्ये येण्यासाठी परवानगी दिल्यास भारत-चीन द्विपक्षीय संबंधांवर आणि सीमाभागातील शांततेवर अनिष्ट परिणाम होतील, असा इशारा चीनने आज दिला आहे. भारताने मात्र चीनचा हा इशारा धुडकावला आहे. 

तिबेटचे सर्वोच्च धार्मिक नेते दलाई लामा हे अरुणाचल प्रदेश सरकारच्या निमंत्रणावरून एप्रिलमध्ये राज्याच्या भेटीला येणार आहेत. अरुणाचल प्रदेश हा दोन्ही देशांमधील वादग्रस्त भाग असल्याचा चीनचा दावा असून, येथे कोणत्याही मोठ्या नेत्याच्या प्रवेशाला त्यांचा विरोध असतो. त्यातच दलाई लामा यांनाही त्यांचा विरोध असल्याने त्यांनी द्विपक्षीय संबंध दुरावण्याचाच इशारा दिला आहे.

याबाबत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ''दलाई लामा यांना भारत सरकारने अरुणाचल प्रदेशमध्ये जाण्याची परवानगी दिल्याच्या बातमीमुळे आम्ही चिंतेत आहोत. या वादग्रस्त भागातील दलाई लामा यांच्या प्रवेशाला आमचा विरोध आहे. दलाई लामा हे फार पूर्वीपासून चीनविरोधी कारवाया करत आहेत. भारताला याबाबतची आमची भूमिका माहीत आहे. त्यामुळे या दौऱ्यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांवर आणि भारत-चीन सीमेवर असलेल्या शांततेवर परिणाम होऊ शकतो.''

चीनच्या या इशाऱ्याकडे भारताने मात्र दुर्लक्ष केले आहे. उलट, अरुणाचल प्रदेशमध्ये दलाई लामा यांना केंद्र सरकारचेही अधिकारी भेटून त्यांचे स्वागत करतील, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दलाई लामा हे धार्मिक यात्रेसाठी अरुणाचल प्रदेशला जात असून, धर्मनिरपेक्ष लोकशाही देश असल्याने त्यांना अडविणार नाही, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

Web Title: Dalai Lama China Arunachal Pradesh India