...तर तिबेटही चीनमध्ये राहु शकतो: दलाई लामा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 मार्च 2018

युरोपिअन युनियन या संकल्पनेचा मी प्रशंसक आहे. संयुक्त हित हे एका राष्ट्राच्या हितापेक्षा नेहमीच मोठे असते. अशा संकल्पनेचा स्वीकार केल्यास मी चीनमध्ये राहण्यास तयार आहे

बीजिंग - ""युरोपिअन युनियन'प्रमाणे तिबेटही चीनमध्ये राहु शकतो,'' असे तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरु दलाई लामा यांनी म्हटले आहे. तिबेटला परतण्याची इच्छा व्यक्त करत दलाई लामा यांनी तिबेटला स्वातंत्र्य नव्हे; तर स्वायत्तता हवी असल्याची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली.

"युरोपिअन युनियन या संकल्पनेचा मी प्रशंसक आहे. संयुक्त हित हे एका राष्ट्राच्या हितापेक्षा नेहमीच मोठे असते. अशा संकल्पनेचा स्वीकार केल्यास मी चीनमध्ये राहण्यास तयार आहे,'' असे लामा म्हणाले. लामा हे फुटीरतावादी असून तिबेट हा चीनचाच भाग असल्याची येथील सरकारची ठाम भूमिका आहे. चिनी सैन्य तिबेटमध्ये घुसल्यानंतर लामा यांनी 1959 मध्ये भारतामध्ये आश्रय घेतला होता.

लामा यांना कोणत्याही देशप्रमुखाने भेटू नये, त्यांच्याशी चर्चा करु नये, असा चीनचा आग्रह असतो. अमेरिकेचे याआधीचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी चीनच्या या भूमिकेकडे लक्ष न देता लामा यांची भेट घेतली आहे. सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड्‌ष ट्रम्प यांनी मात्र अजून दलाई लामांची भेट घेतलेली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dalai lama china tibet