ट्रम्प यांच्या नव्या सहकाऱ्यांमुळे भीतीचे वातावरण

वृत्तसंस्था
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

वॉशिंग्टन - अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विभागांच्या प्रमुखपदासाठी निवडलेल्या व्यक्तींमुळे मुस्लिम जगतामध्ये भीतीचे वातावरण असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. ट्रम्प यांच्या या निवडीमुळे अमेरिकेतील मुस्लिम नागरिक आणि आखाती देशांनी परिणामांना समोरे जाण्याची तयारी सुरू केल्याचेही समजते.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ऍटर्नी जनरल, गुप्तचर संस्था सीआयएचे प्रमुख आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार या तीन महत्त्वाच्या पदांवर ज्या अधिकाऱ्यांची नावे जवळपास निश्‍चित केली आहेत, ते सर्व मुस्लिमद्वेष्ट्ये म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या निवडीला मुस्लिम हक्क संघटनांनी विरोध करण्यास सुरवात केली आहे. अमेरिकेशी व्यापारी संबंध असलेल्या आखाती देशांनीही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. ट्रम्प यांच्या या धोरणामुळे संपूर्ण अमेरिकाच मुस्लिमांविरोधात युद्ध पुकारण्यास सज्ज असल्याचा चुकीचा संदेश जाईल, अशी भीती काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही व्यक्त केली आहे.

ऍटर्नी जनरल पदासाठी ट्रम्प यांनी निवडलेले जेफ सेशन्स यांनी मुस्लिमांना अमेरिकाबंदी करण्याच्या ट्रम्प यांच्या घोषणेला पाठिंबा दिला होता.

इस्लामच्या मुळाशी विषारी विचारसरणी असल्याचेही त्यांचे मत आहे. "सीआयए'च्या प्रमुखपदासाठी नाव निश्‍चित झालेले माइक पॉम्पिओ यांनी मुस्लिम ब्रदरहूड या संघटनेवर बंदीसाठी पुढाकार घेतला होता, तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदासाठी नाव जाहीर झालेले निवृत्त लष्करी अधिकारी मायकेल फिन यांनी जाहीरपणे इस्लामला "कर्करोग' असे संबोधले होते. त्यामुळे अशी विचारसरणी असलेल्या तिघांनाही प्रचंड अधिकारांच्या पदावर नेमण्याच्या ट्रम्प यांच्या कल्पनेने मुस्लिमांमध्ये नाराजी आहे.

Web Title: dangerous atmosphere by trump supported member