Dart Test | पृथ्वीच्या संरक्षणासाठी ‘डार्ट’ चाचणी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dart
पृथ्वीच्या संरक्षणासाठी ‘डार्ट’ चाचणी!

पृथ्वीच्या संरक्षणासाठी ‘डार्ट’ चाचणी!

वॉशिंग्टन - पृथ्वीवर लघुग्रह अथवा धूमकेतू धडकू नयेत यासाठीची डबल ॲस्टेरॉईड रिडारेक्शन टेस्ट (डार्ट) मोहीम अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ने आज सुरू केली. यासाठीच्या उपग्रहाचे भारतीय प्रमाण वेळेनुसार आज सकाळी ११. ५१ वाजता स्पेस एक्सच्या फाल्कन ९ या अग्निबाणाद्वारे कॅलिफोर्नियातून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. हा उपग्रह आता अवकाशात जाऊन लघुग्रहावर धडकणार आहे. अशा प्रकारे धडक घडवून आणून लघुग्रहाची किंवा धूमकेतूची दिशा बदलता येऊ शकते का याचा अभ्यास केला जाईल. एखादा लघुग्रह किंवा मोठी उल्का पृथ्वीच्या कक्षेत येण्यापासून वाचविता येऊ शकेल का हे पाहण्याचाही हेतू या प्रयोगामागे आहे.

अशी आहे मोहीम

 • डबल ॲस्टेरॉईड रिडायरेक्शन टेस्ट (डार्ट) असे नाव

 • अवकाशात सोडण्यात आलेले यान ‘डिडिमॉस’ या लघुग्रहाला धडकविण्यात येणार

 • या टकरीमुळे ‘डिडिमॉस’च्या दिशेत किंवा मार्गात बदल होतो का याचे निरीक्षण करणार

 • मोहिमेसाठी खर्च - सुमारे दोन हजार कोटी रुपये

असा आहे डिडिमॉस

 • डिडिमॉस लघुग्रहाचा शोध १९९६मध्ये लागला

 • डिडिमॉसचा ७८० मीटर लांब आहे.

 • ‘डिडिमॉस’ भोवती एक लघुग्रह फिरतो, त्याचे ‘डिमॉर्फस’ असे नाव आहे. त्याची लांबी १६० मीटर आहे.

 • ‘डिडिमॉस’ पृथ्वीला धडकण्याची शक्यता नाही, त्यामुळे प्रयोगासाठी या लघुग्रहाची निवड केली.

 • यापूर्वी ‘डिडिमॉस’ २००३मध्ये पृथ्वीच्या जवळून गेला होता. आता २०२२मध्ये तो पुन्हा एकदा पृथ्वीजवळून जाणार आहे.

हेही वाचा: 'Garlic म्हणजे अदरक', पाकिस्तानच्या मंत्र्याला आलं आणि लसणातील फरक कळेना

असा होणार प्रयोग

 • अवकाशात सोडण्यात आलेल्या यानाचे दोन भाग आहेत

 • एक भाग (इम्पॅक्टर) लघुग्रहावर धडकेल, तर दुसरा भाग या घटनेची छायाचित्रे काढून पृथ्वीवर पाठवेल

 • ‘इम्पॅक्टर’ साधारण २३७६० किलोमीटर प्रतितास या वेगाने ‘डिडिमॉस’वर धडकेल

 • या धडकेमुळे लघुग्रहाचा वेग एक टक्क्यांनी कमी होण्याची आणि त्याचा परिभ्रमणाचा मार्ग बदलण्याची शक्यता आहे.

 • ही सर्व घटना ‘लिसिया क्युब’ या यानाच्या छोट्या भागाद्वारे नोंदविली जाईल. हा भाग इटलीच्या शास्त्रज्ञांनी विकसित केला आहे. प्रत्यक्ष धडकेपूर्वी दोन दिवस हा भाग मुख्य यानापासून वेगळा होईल.

 • दरवर्षी हजारो उल्का किंवा लघुग्रह पृथ्वीच्या वातावरणात येतात. परंतु, धडकण्यापूर्वीच त्या जळून जातात.

 • सैबेरियामध्ये १९०८मध्ये ४० मीटर आकाराची उल्का पडली होती. त्याच्यामुळे लंडन शहराच्या आकाराएवढे जंगल नष्ट केले होते.

 • आतापर्यंत १० लाखांहून अधिक उल्का वा लघुग्रहांचा शोध लागला आहे. पृथ्वीपासून सूर्यापर्यंतचे जेवढे अंतर आहे, तेवढ्या अंतरावर साधारण २७ हजार लघुग्रह अथवा उल्का असल्याचा अंदाज. या लघुग्रहांचा आकार १४० मीटरहून अधिक आहे.

असे आहे ‘डार्ट’ अवकाश यान

 • ६.२ फूट - लांब

 • ५.९ फूट - रुंद

 • ६१० किलो - वजन

 • ८.५ फूट - उंच

 • ६.६ किलोवॉट - ऊर्जा निर्मिती क्षमता

 • १ वर्ष - मोहिमेचा कालावधी

मोहिमेतील टप्पे

 • जून २०१७ - यानाच्या आराखड्यावर काम सुरू

 • २४ नोव्हेंबर २०२१ - डार्ट यानाचे प्रक्षेपण

 • सप्टेंबर २०२२ - अवकाश यान डिडिमॉसच्या जवळ पोहोचणार

 • ऑक्टोबर २०२२ - अवकाश यान लघुग्रहाला धडकणार

loading image
go to top