पोर्न साईटवरून हजारो भारतीयांचा डेटा लिक 

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

10 लाखांहून अधिक लोकांची माहिती पोर्नसाईट्‌सवरून लिक झाली आहे. विशेष म्हणजे त्यामध्ये सहा हजारांहून अधिक भारतीय वापरकर्त्यांचा समावेश आहे. 

नवी दिल्ली : इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे मोबाईल आणि संगणकावरील डेटाचोरीचे प्रमाण वाढत चालले आहे. काही सोशल मीडिया साईट्‌ससह ऍप्स आणि वेबसाईट्‌स सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. पोर्न वेबसाईट्‌स देखील त्याला अपवाद नाही आहे. एका डेटासुरक्षा विषयक संशोधन संस्थेने जारी केलेल्या अहवालानुसार, 10 लाखांहून अधिक लोकांची माहिती पोर्नसाईट्‌सवरून लिक झाली आहे. विशेष म्हणजे त्यामध्ये सहा हजारांहून अधिक भारतीय वापरकर्त्यांचा समावेश आहे. 

पोर्न वेबसाईट्‌स सुरक्षित नसल्याने त्या सहजपणे हॅक केल्या जातात. त्या माध्यमातून पोर्न साईट्‌सला भेट देणारे युजर्स, त्यांचा ई-मेल आयडी, त्यांच्या लोकेशनची माहिती चोरली जाते. वापरकर्त्यांच्या या माहितीच्या आधारे हॅकर्सकडून त्यांना धमकावले जात असून "तुम्ही पोर्न साईट्‌सला भेट देता, काय बघता त्याची संपूर्ण माहिती आमच्याकडे आहे. त्यामुळे अमुक रक्कम भरा अन्यथा याबाबतची जाहीर वाच्यता करण्यात येईल' अशी धमकी दिली जाते. तसेच वापरकर्त्यांचे लोकेशन देखील माहिती होत असल्याने त्यातून चोरी, खंडणीसारखे गंभीर गुन्हे घडण्याची शक्‍यता देखील व्यक्त केली जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: data leak from porn website