फ्रीडमन इस्राईलमधील नवे अमेरिकन राजदूत

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

वॉशिंग्टन - डेव्हिड फ्रीडमन हे इस्राईलमधील अमेरिकेचे नवे राजदूत असतील, अशी घोषणा अमेरिकेचे होणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारमोहिमेदरम्यान फ्रीडमन हे ट्रम्प यांचे अमेरिका-इस्राईल संबंधांसदर्भातील सल्लागार होते.

"फ्रीडमन यांच्या इस्राईलशी असलेल्या उत्तम संबंधांच्या' पार्श्‍वभूमीवर या अत्यंत संवेदनशील जबाबदारीसाठी त्यांची निवड करण्यात आली असल्याचे ट्रम्प यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र फ्रीडमन यांची निवड वादळी ठरण्याची शक्‍यता आहे.

या नियुक्तीचे स्वागत करताना इस्राईलची पूर्वेकडील राजधानी असलेल्या जेरुसलेम शहरात अमेरिकेचा दूतावास आता हलविण्यात येईल, असे फ्रीडमन यांनी म्हटले आहे. फ्रीडमन यांच्या या भूमिकेमुळे पॅलेस्टिनी नागरिक संतप्त होण्याचा अंदाज आहे. पूर्व जेरुसलेमची भूमी हा पॅलेस्टाईनचा सार्वभौम प्रदेश असल्याची त्यांची भूमिका आहे. या पार्श्‍वभूमीवर, संयुक्त राष्ट्रसंघानेही जेरुसलेम शहरास इस्राईलची राजधानी म्हणून मान्यता दिलेली नाही; आणि अमेरिकेचा इस्राईलमधील दूतावासही गेली काही दशके तेल अवीव शहरामध्येच आहे. मात्र हा दूतावास जेरुसलेमध्ये हलविण्यात येईल, असे आश्‍वासन ट्रम्प यांनी प्रचारमोहिमेदरम्यान दिले होते.

अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात अमेरिका-इस्राईल संबंध तणावग्रस्त झाले होते. मात्र इस्राईलचे आक्रमक पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ट्रम्प यांच्या निवडीचे स्वागत केले आहे. अमेरिका-इस्राईलद्विपक्षीय संबंधांसह एकंदरच पश्‍चिम आशियातील राजकारण सध्या एका निर्णायक वळणावर असताना फ्रीडमन यांची झालेली ही नियुक्ती अत्यंत संवेदनशील मानण्यात येत आहे.

Web Title: David Friedman to be Trump's ambassador to Israel