दाऊद इब्राहिमची प्रकृती ठणठणीत: छोटा शकील

वृत्तसंस्था
शनिवार, 29 एप्रिल 2017

दाऊद भाईंची प्रकृती उत्तम आहे. त्यांच्या मृत्युसंदर्भात वा प्रकृती ढासळण्यासंदर्भात देण्यात आलेल्या बातम्या निखालस खोट्या आहेत

नवी दिल्ली - पाकिस्तानमध्ये गेली काही वर्षे दडून बसलेला कुख्यात गॅंगस्टर दाऊद इब्राहिम याची प्रकृती ठणठणीत असल्याचा दावा त्याचा निकटवर्तीय छोटा शकील याने केला आहे.

दाऊद हा मरण पावल्याची शक्‍यता व्यक्त करण्यात आल्याच्या पार्श्‍वभूमीवर शकील याने हा खुलासा केला आहे. दाऊद याची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त काही पाकिस्तानी माध्यमांनी दिले होते. मात्र या सर्व अफवा असल्याचे शकील याने म्हटले आहे. कराची येथे असलेल्या शकील याने एका वृत्तवाहिनीशी दूरध्वनीवरुन बोलताना ही माहिती दिली.

"दाऊद भाईंची प्रकृती उत्तम आहे. त्यांच्या मृत्युसंदर्भात वा प्रकृती ढासळण्यासंदर्भात देण्यात आलेल्या बातम्या निखालस खोट्या आहेत,'' असे शकील याने म्हटले आहे. दाऊद याला कराचीमधील आगा खान रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांकडून देण्यात आले होते.

Web Title: Dawood bhai is fit and fine: Chhota Shakeel