दाऊदबद्दल भावानेच केला मोठा खुलासा; अनीस इब्राहिमचं स्पष्टीकरण

वृत्तसंस्था
Sunday, 7 June 2020

दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस इब्राहिमने स्पष्टीकरण दिले असून त्याने म्हटले आहे की, दाऊद आणि त्याची पत्नी महजबीन कोरोना पॉझिटीव्ह नाही.

नवी दिल्ली : दोन दिवसांपासून अंडरवल्ड डॉन दाऊद इब्राहिम कोरोना पॉजिटिव्ह असल्याच्या बातम्या दोन दिवसांपासून माध्यमांवर झळकत होत्या. अशात दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस इब्राहिमने स्पष्टीकरण दिले असून त्याने म्हटले आहे की, दाऊद आणि त्याची पत्नी महजबीन कोरोना पॉझिटीव्ह नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दाऊदचे सुरक्षा रक्षक आणि घरातील इतर लोकांना क्वारंटाईन केल्याचं देखील बोललं जात होतं. पण, अनीसने म्हटलं आहे की, त्याचा भाऊ हा कोरोना पॉझिटीव्ह नाही. तो आपल्या घरीच आहे. दाऊदला सैन्याच्या रुग्णालयात दाखल केल्याचं देखील बोललं जात होतं. पण, अनीसने याबाबत मोठा खुलासा करत सर्व गोष्टीवर पडदा टाकला आहे.
-----------
जी सेव्हनवरून चीनचा भारताला इशारा; अमेरिकेचा हा डाव असल्याचे मत
-----------
पुजारी करतायेत सॅनिटायझर वापरायला विरोध; कारण, वाचून व्हाल चकित
------------
दाऊद इब्राहिमचा इतिहास काय आहे?
१९९३मध्ये मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटाच्या घटनेनंत देश सोडून गँगस्टर दाऊद इब्राहिम हा पसार झाला होता. त्यानंतर तो पाकिस्तानात असल्याचे सातत्याने समोर आले होते. मात्र, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद हा पाकिस्तानात वास्तव्यास असलेल्या आरोप पाकिस्तानकडून नेहमीच फेटाळण्यात आले आहेत. १९९३मध्ये सलग १३ साखळी बॉम्बस्फोट झाले होते. त्यामध्ये ३५०हून जणांचा मृत्यू झाला होता. तर १२००पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. भारत सरकारने २००३मध्ये अमेरिकेसोबत मिळून दाऊदला ग्लोबल टेररिस्ट म्हणून घोषित केले.

अनीस इब्राहिमबद्दल...
यूएईमधील पंचतारांकित हॉटेल्स, पाकिस्तानमधील मोठमोठे बांधकाम प्रकल्प आणि ट्रान्सपोर्ट सेवेच्या डी कंपनीची प्रमुख जबाबदारी अनीस इब्राहिम पाहतो. अनिसच्या म्हणण्यानुसार, दाऊदसह त्याच्या कुटुंबियातील कोणत्याही सदस्यांला कोरोनाची लागण झालेली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Is Dawood Ibrahim infected with coronavirus? anis Ibrahim clarifies