दाऊदची ब्रिटनमधील कोट्यवधींची मालमत्ता जप्त

वृत्तसंस्था
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

ब्रिटनकडील दाऊदची 21 उपनावे 
ब्रिटिश सरकारकडे असलेल्या नोंदणी रजिस्टरमधे दाऊद इब्राहीमच्या 21 उपनावांचा समावेश आहे. यामध्ये अब्दुल, शेख, इस्माइल, अब्दुल अजीज, अब्दुल हमीद, अब्दुल रहमान, शेख, मोहम्मद, अनीस, इब्राहिम, शेख, मोहम्मद भाई, बड़ा भाई, दाऊद भाई, इकबाल, दिलीप, अजीज, इब्राहिम, दाऊद, फारुकी, शेख, हसन, कासकर, दाऊद हसन, शेख कासकर, दाऊद, हसन, शेख, इब्राहिम, कासकर, इब्राहिम, मेमन, कासकर, दाऊद, हसन, इब्राहिम, मेमन, दाऊद, साहब, हाजी, सेठ आणि बडा या नावांचा समावेश आहे.

लंडन : भारताचा मोस्ट वॉंटेड डॉन दाऊद इब्राहीमच्या मालमत्ता जप्त करण्याचा निर्णय ब्रिटन सरकारने घेतला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे हे मोठे यश समजण्यात येत आहे.

दाऊदची ब्रिटनमधील मालमत्ता आर्थिक निर्बंधांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय यापूर्वीच ब्रिटन सरकारने घेतला होता. त्यानंतर आता त्याच्या मालमत्तांची जप्ती करण्यात आली आहे. ब्रिटनमध्ये दाऊदची 6.7 बिलियन डॉलर म्हणजे 43 हजार कोटी रुपयांची संपत्ती आहे. ब्रिटन सरकारच्या या निर्णयामुळे भारताच्या कुटनितीचा विजय असल्याचे मानले जात आहे. भारताने 2015 मध्ये ब्रिटन  सरकारला दाऊदच्या संपत्तीबाबतचे दस्तावेज दिले होते. दाऊद इब्राहिम हा मुंबईत 1993 मध्ये झालेल्या स्फोटातील मुख्य सूत्रधार आहे.

ब्रिटनने तयार केलेल्या यादीनुसार 'कासकर दाऊद इब्राहीम'चे मिडलँड येथे निवासस्थानाबरोबर अन्य मालमत्तांचा समावेश आहे. ब्रिटनने तयार केलेल्या यादीत दाऊदच्या पाकिस्तानातील तीन पत्ते- घर नं. 37, गल्ली नंबर 30, डिफेंस हाउसिंग ऑथोरिटी, कराची आणि कराचीतील नूराबाद येथील मालमत्ता तसेच व्हाईट हाउस, सऊदी मस्जिदीजवळ, क्‍लिफटर, कराची या मालमत्तांचा समावेश आहे. 

ब्रिटनकडील दाऊदची 21 उपनावे 
ब्रिटिश सरकारकडे असलेल्या नोंदणी रजिस्टरमधे दाऊद इब्राहीमच्या 21 उपनावांचा समावेश आहे. यामध्ये अब्दुल, शेख, इस्माइल, अब्दुल अजीज, अब्दुल हमीद, अब्दुल रहमान, शेख, मोहम्मद, अनीस, इब्राहिम, शेख, मोहम्मद भाई, बड़ा भाई, दाऊद भाई, इकबाल, दिलीप, अजीज, इब्राहिम, दाऊद, फारुकी, शेख, हसन, कासकर, दाऊद हसन, शेख कासकर, दाऊद, हसन, शेख, इब्राहिम, कासकर, इब्राहिम, मेमन, कासकर, दाऊद, हसन, इब्राहिम, मेमन, दाऊद, साहब, हाजी, सेठ आणि बडा या नावांचा समावेश आहे. 

Web Title: Dawood Ibrahim's assets seized in UK