दाऊदच्या "मुनिमा'स ब्रिटनमध्ये अटक 

रविवार, 19 ऑगस्ट 2018

1993 च्या मुंबई साखळी बॉंबस्फोटातील मुख्य आरोपी कुख्यात गुंड दाऊदची चोहोबाजूंनी कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार ब्रिटनच्या सुरक्षा दलाने दाऊदचा फायनान्स मॅनेजर जाबिर मोतीला अटक केली आणि त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. जाबिरला एका हॉटेलमध्ये अटक करण्यात आली. कराची आणि दुबईत जाबिरचे आर्थिक व्यवहार दाऊद आणि त्याची पत्नी आणि निकटवर्तीयांशी होत असे. त्याचा फायदा उचलत ब्रिटनने सापळा रचला आणि त्याला अटक केली. 

लंडन: कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा फायनान्स मॅनेजर जाबिर मोतीला ब्रिटनमध्ये अटक करण्यात आली आहे. दाऊदचा "मुनिम' म्हणून ओळखला जाणारा जाबिर मोती हा पाकिस्तानात राहत होता आणि दाऊदचे जगभरातील आर्थिक व्यवहार सांभाळत असे.
 
1993 च्या मुंबई साखळी बॉंबस्फोटातील मुख्य आरोपी कुख्यात गुंड दाऊदची चोहोबाजूंनी कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार ब्रिटनच्या सुरक्षा दलाने दाऊदचा फायनान्स मॅनेजर जाबिर मोतीला अटक केली आणि त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. जाबिरला एका हॉटेलमध्ये अटक करण्यात आली. कराची आणि दुबईत जाबिरचे आर्थिक व्यवहार दाऊद आणि त्याची पत्नी आणि निकटवर्तीयांशी होत असे. त्याचा फायदा उचलत ब्रिटनने सापळा रचला आणि त्याला अटक केली. 

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मोती हा दुबई, आफ्रिकेसह अन्य देशांत दाऊदचे व्यवहार पाहायचा. त्याच्यावर तस्करीसह अनेक कारवायात सहभागी असल्याचे आरोप आहेत. जाबिरकडे पाकिस्तानी पासपोर्ट सापडला असून त्यावर कराचीचा पत्ता आहे. त्याच्याकडे ब्रिटनचा दहा वर्षांचा व्हिसा देखील आहे. दाऊदची पत्नी महजीसमवेत तो पैशाचे व्यवहार सांभाळायचा. एवढेच नाही तर तो सक्रिय रूपातून दाऊदच्या कुटुंबीयांना मदत करत असे. कराचीत दाऊदच्या निवासस्थानाच्या परिसरातही त्याचे घरही आहे. जाबिर मोती हा ऍटिंग्वा, बार्बाडोस, हंगेरी आणि डॉमिनिकन रिपब्लिकचे नागरिकत्व घेण्यासाठी प्रयत्नशील होता.