esakal | इम्रान खान म्हणतात, पाकमध्ये यायचं की स्वतंत्र राज्य हवं? निर्णय काश्मीरी जनतेला घेऊदे
sakal

बोलून बातमी शोधा

imran khan

'पाकमध्ये यायचं की स्वतंत्र राज्य हवं? निर्णय काश्मीरी जनतेला घेऊदे'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

इस्लामाबाद : ‘‘काश्‍मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचे आहे की स्वतंत्र राज्य हवे, याचा निर्णय त्यांनीच घ्यावा, अशी पाकिस्तानचे धोरण असल्याचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शुक्रवारी जाहीर केले. काश्‍मीर हा भारताचा अविभाज्य भाग असताना दहशतवादाच्या आडून पाकिस्तान तेथे सतत कुरापती सुरू असतात. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्‍मीरबद्दल नवा राग छेडला आहे. पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये रविवारी (ता.२५) निवडणूक होणार आहे. त्यासाठी तरार खाल येथे काल प्रचारसभेत बोलताना इम्रान खान हे विधान केले. काश्‍मीरला पाकिस्तानचा वेगळा प्रांत घोषित करण्याची तयारी त्यांचे सरकार करीत आहे, हा दावाही त्यांनी फेटाळला. पाकव्याप्त काश्‍मीरला वेगळ्या राज्याचा दर्जा देण्याची योजना इम्रान खान यांच्या सरकारची असल्याचा आरोप विरोधी पक्ष करीत आहेत.

हेही वाचा: मोठी घोषणा! तळीये गाव म्हाडा वसवणार - गृहनिर्माण मंत्री आव्हाड

पाकिस्तान मुस्लीम लीग - नवाज ((पीएमएल-एन) या पक्षाच्या नेत्या मरियम नवाज यांनी ‘काश्‍मीरचा दर्जी बदलण्याचा व त्याला वेगळ्या राज्याचा दर्जा देण्याचा निर्णय झाला असल्याचा दावा गेल्या आठवड्यात प्रचारादरम्यान केला होता. हा दावा खान यांनी फेटाळला. अशा गोष्टी नेमक्या कोठून येतात, हे समजत नाही, असे ते म्हणाले.

हेही वाचा: पेगॅसस बनवणारी कंपनी म्हणते, आमच्यामुळे लाखो लोक सुखाने झोपू शकतात

‘यूएन’नंतर स्वतंत्र कौल घेणार

‘‘एक दिवस असा येईल की संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) प्रस्तावानुसार भविष्याचा निर्णय घेण्याची परवानगी काश्‍मीरी जनतेला मिळेल आणि त्यादिवशी काश्‍मीरमधील लोक पाकिस्तानबरोबर येण्याचा निर्णय घेतील. ‘यूएन’च्या जनमत चाचणीनंतर आमचे सरकारही जनमतचा कानोसा घेईल. त्यानंतर पाकिस्तानबरोबर यायचे की स्वतंत्र राज्य हवे, असा पर्याय त्यांच्यापुढे असेल,’’ असे इम्रान खान म्हणाले.

loading image
go to top