कोरोनावर डेक्सामेथासोन प्रभावी तर ऑक्सफर्डची ट्रायल थांबवणं हा वेक अप कॉल - WHO

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 September 2020

व्हॅक्सिन आणि त्याच्या ट्रायलबाबत सांगताना टेड्रोस यांनी म्हटलं की, जगभरात सध्या 180 लशींवर काम सुरु आहे. त्यातील जवळपास 35 लशींची मानवी चाचणी सुरु असल्याचंही त्यांनी म्हटलं.

जिनिव्हा - संपूर्ण जग सध्या कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडलं आहे. जगातील अनेक देशांमध्ये कोरोना लशीच्या शोधासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. अनेक लशींची मानवी चाचणी सुरु आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेनं गुरुवारी म्हटलं की, कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक अशा प्रोडक्टसाठी मदतीसाठी योगदान द्यावं असं आवाहन केलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेचा ACT-Accelerator programme आधीपासूनच व्हॅक्सिनच्या संशोधनासाठी काम करत आहे असं WHO चे संचालक टेड्रोस यांनी सांगितलं. 

लशीच्या शोध लागला तरी क्लिनिकल ट्रायल्स, निर्मिती, परवाने आणि त्याचं वितरण याची यंत्रणा उभा करणं आणि ती वाढवण्याची आवश्यकता असल्याचं टेड्रोस यांनी म्हटलं. डेक्सामेथासोन कोरोना रुग्णांवर प्रभावी ठरत असल्याचं आणि त्यामुळे रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण तब्बल 20 टक्के कमी होत असल्याचं आधीच सिद्ध झालं असल्याची उल्लेख WHOने पुन्हा एकदा केला.

व्हॅक्सिन आणि त्याच्या ट्रायलबाबत सांगताना टेड्रोस यांनी म्हटलं की, जगभरात सध्या 180 लशींवर काम सुरु आहे. त्यातील जवळपास 35 लशींची मानवी चाचणी सुरु असल्याचंही त्यांनी म्हटलं. 

हे वाचा - भारतातील बालमृत्यूचे प्रमाण घटले; संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

WHO ने म्हटलं होतं की, स्टेरॉइड औषधे कोरोनाचा संसर्ग झालेल्या गंभीर रुग्णांना देता येतील. डेक्सामेथासोन औषधं दिल्यानंतर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी होत असल्याचं समोर आलं आहे. सुरुवातीची लक्षणं असलेल्या रुग्णांना हे औषध देण्याची गरज नसल्याचंही जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dexamethasone effective on covid 19 and astrageneca incident wake up call for us says who