भारताला अमेरिकेकडून मिळालेले रिअल टाईम Intel? अधिकारी म्हणतात... I India China Border Tawang Clash | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tawang Clash

या चकमकीत दोन्ही बाजूचे सैनिकही जखमी झाले, पण आमच्या एकाही सैनिकाचा मृत्यू झाला नाही किंवा कोणीही गंभीर जखमी झालं नाही.

India China Border Tawang Clash : भारताला अमेरिकेकडून मिळालेले रिअल टाईम Intel? अधिकारी म्हणतात...

अमेरिकेतील एका मीडिया रिपोर्टमध्ये (America Media Report) मोठा दावा करण्यात आलाय. गेल्या वर्षी अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये (Arunachal Pradesh Tawang Sector) भारत आणि चिनी सैन्यादरम्यान झालेल्या चकमकीत अमेरिकन सुरक्षा एजन्सी पेंटागॉननं (US Security Agency Pentagon) भारतीय लष्कराला (Indian Army) महत्त्वाची गुप्तचर माहिती दिली होती.

याबाबत पत्रकारांनी विचारले असता, व्हाईट हाऊसनं याची पुष्टी करण्यास नकार दिला. व्हाईट हाऊसमधील राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे समन्वयक जॉन किर्बी (John Kirby) यांनी मीडिया रिपोर्टच्या प्रश्नावर एकाच ओळीत उत्तर दिलं. ते म्हणाले, 'नाही, मी याची पुष्टी करू शकत नाही.'

अहवालात कोणते दावे केले?

यूएस सरकारनं पहिल्यांदाच अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरमध्ये चिनी सैन्यानं केलेल्या घुसखोरीपूर्वी चिनी पोझिशन्स आणि ताकदीबद्दल भारतीय लष्कराला रिअल-टाइम तपशील प्रदान केला, असं यूएस न्यूज अँड वर्ल्डनं वृत्त दिलं आहे. 9 डिसेंबर 2022 रोजी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) शेकडो भारतीय आणि चिनी सैन्य एकमेकांशी भिडले.

सूत्रांच्या हवाल्यानं या अहवालात म्हटलंय, अमेरिकन गुप्तचर अहवालामुळंच भारताला चिनी सैन्याला मागं हटवण्यात यश आलं आहे. पेंटागॉननं सामायिक केलेल्या माहितीमध्ये कारवाई करण्यायोग्य उपग्रह प्रतिमांचा समावेश होता.

संरक्षण मंत्री काय म्हणाले?

2022 च्या घटनेनंतर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं विधान संसदेत समोर आलं. संरक्षण मंत्री म्हणाले, '9 डिसेंबर 2022 रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमधील यंगस्टे भागात पीएलएच्या सैनिकांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अतिक्रमण केलं आणि एकतर्फी स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. चीनच्या या प्रयत्नाला आपल्या लष्करानं खंबीरपणे तोंड दिलं. भारतीय सैन्यानं धैर्यानं पीएलएला आमच्या प्रदेशात अतिक्रमण करण्यापासून रोखलं आणि त्यांना त्यांच्या पोस्टवर परत जाण्यास भाग पाडलं.'

या चकमकीत दोन्ही बाजूचे सैनिकही जखमी झाले, पण आमच्या एकाही सैनिकाचा मृत्यू झाला नाही किंवा कोणीही गंभीर जखमी झालं नाही. भारतीय लष्करी कमांडरनं वेळीच हस्तक्षेप केल्यामुळं पीएलएचं सैनिक परत त्यांच्या जागी गेले, असंही संरक्षण मंत्री म्हणाले.

भारत-चीन द्विपक्षीय संबंधांवर परिणाम

अलीकडं, परराष्ट्र मंत्रालयानं (MEA) आपल्या वार्षिक अहवाल 2021-22 मध्ये म्हटलंय की, वास्तविक नियंत्रण रेषेची (LAC) स्थिती बदलण्यासाठी चीनकडून सुरू असलेल्या एकतर्फी प्रयत्नांमुळं भारत-चीन द्विपक्षीय संबंधांवर परिणाम झाला आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या अहवालानुसार, एप्रिल-मे 2020 पासून चीननं पश्चिम क्षेत्रातील LAC वर एकतर्फी स्थिती बदलण्याचे अनेक प्रयत्न केले आहेत, त्यामुळं LAC वर अडथळा निर्माण झाला आहे.