Video : होर्डिंगवर प्ले झाला अर्धा तास पॉर्न व्हिडिओ...

वृत्तसंस्था
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

एका रस्त्याच्या कडेला असलेल्या जाहिरातीच्या होर्डिंगवर जाहिरातीऐवजी पॉर्न व्हिडिओ प्ले झाला, तोही तब्बल अर्धातास.

न्यूयॉर्क : अमेरिकेतील एका रस्त्याच्या कडेला असलेल्या जाहिरातीच्या होर्डिंगवर जाहिरातीऐवजी पॉर्न व्हिडिओ प्ले झाला, तोही तब्बल अर्धातास. काही चालकांनी व्हिडिओचे शुटिंग करून पोलिसांकडे तक्रार दाखल केली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मिशिगनमधील औबर्न हिल्स परिसरामध्ये रस्त्याच्या बाजूला एक जाहिरातीसाठी होर्डिंग लावण्यात आले आहे. मात्र, जाहिरातीऐवजी मध्येच पॉर्न व्हिडिओ सुरू झाला. रस्त्याने जाणाऱया वाहनचालकांचे लक्ष यामुळे विचलीत झाले. काही चालकांनी होर्डिंगचे शुटिंग करून व्हायरल केले तर काही चालकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी दखल घेतल्यानंतर व्हिडिओ थांबविण्यात आला. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.

ट्रक चालक जस्टीन कामो म्हणाले, 'मी ट्रक चालवत असतानाच अचानक होर्डिंगवर मला पॉर्न व्हिडिओ सुरु असल्याचे दिसले. त्यामुळे माझे लक्ष विचलित झाले. तो लेस्बियन पॉर्न व्हिडिओ होता. रात्रीच्या अंधारामध्ये एखाद्या मोठ्या पडद्यावर चित्रपट दाखवल्याप्रमाणे हा व्हिडिओ चलकांना दिसत होता. यामुळे अनेकांचे लक्ष विचलित झाले.'

चक मॅकहॉन म्हणाले, 'प्रथम मला हा व्हिडिओ एखादी जाहिरात असल्याचे वाटले. पण, काही वेळातच तो पॉर्न व्हिडिओ असल्याचे लक्षात आले. पॉर्न व्हिडिओ तब्बल 20 ते 25 मिनिटे दिसत होता. या व्हिडिओमुळे अनेक चालकांचे लक्ष विचिलित झाले. व्हिडिओमुळे अपघाताची शक्यता होती. या प्रकारणातील दोषींवर कारवाई करण्यात यावी.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Digital billboard plays graphic porn video at usa