अमेरिका आणि चीनमधील वाद वाढणार आहे; म्हणून अमेरिका....

पीटीआय
Thursday, 6 August 2020

भारताला होणाऱ्या शस्त्रविक्री प्रक्रियेत वेग आणण्याचा अमेरिकेचा प्रयत्न असल्याचे येथील माध्यमांनी म्हटले आहे. यामध्ये एक हजार पौंड वजनाचे बाँब आणि क्षेपणास्त्रे वाहून नेणाऱ्या ड्रोन विमानांचाही समावेश आहे. भारत आणि चीनमधील तणाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर या हालचाली होत आहेत.

वॉशिंग्टन - भारताला होणाऱ्या शस्त्रविक्री प्रक्रियेत वेग आणण्याचा अमेरिकेचा प्रयत्न असल्याचे येथील माध्यमांनी म्हटले आहे. यामध्ये एक हजार पौंड वजनाचे बाँब आणि क्षेपणास्त्रे वाहून नेणाऱ्या ड्रोन विमानांचाही समावेश आहे. भारत आणि चीनमधील तणाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर या हालचाली होत आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गलवान खोऱ्यात १५ जूनला भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीत भारताचे २० जवान हुतात्मा झाले होते तर, चीनचेही ३५ सैनिक मारले गेले होते. या घटनेनंतर दोन्ही देशांमधील तणाव प्रचंड वाढला आहे. या पार्श्वभूमीवर भारताला मदत करण्यासाठी त्यांना शस्त्रविक्री वेगाने करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. यामुळे अमेरिका आणि चीनमधील वादही वाढणार आहे, असे येथील एका नियतकालिकाने अमेरिकी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, भारताला शस्त्रविक्री करताना चौकटीबाहेर जाऊन प्रक्रिया वेगवान करण्यासाठी अमेरिका सरकारने आराखडा आखला आहे.

Image may contain: text that says "संरक्षण विक्रीत वाढ २००८ जवळपास शून्य २०२० २० अब्ज डॉलर भारतासाठी अमेरिकेने केला बदल गेल्या काही काळातील खरेदी क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रक धोरणाची व्याख्या बदलून बदलून वेगवान ड्रोन विक्री करणे सुलभ केले. शस्त्रविक्रीसाठी अमेरिकेकडूनच पुढाकार शस्त्रविक्रीसाठी भारताला 'नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन'च समान विशेष वागणूक सी हॉक हेलिकॉप्टर २०८ अब्ज डॉलर अपाचे हेलिकॉप्टर ७९.६० कोटी डॉलर एलएआयसी यंत्रणा १८.९० कोटी डॉलर"

भयंकर! स्फोटानंतर उद्ध्वस्त झालेल्या बैरुतचे सॅटेलाइट PHOTO व्हायरल

यात  उच्च तंत्रज्ञानाचा वापर झालेली शस्त्रे, ड्रोन विमाने आहेत. भारतासारख्या मित्र देशांना लष्करी ड्रोन विक्रीतील अडथळे दूर करण्यासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच पुढाकार घेतला होता. भारताला लवकरच एक हजार पौंड वजनाचे बाँब आणि क्षेपणास्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेले ‘एमक्यू-१ प्रीडेटर’ ड्रोनही देण्यासाठी ट्रम्प आग्रही आहेत.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dispute between the US and China is set to escalate