ट्रम्प-ट्‌विटर यांच्यात जुंपली

पीटीआय
गुरुवार, 28 मे 2020

मतदारांची फसवणूक होऊ नये यासाठी...
ट्‌विटरने ट्रम्प यांच्या दोन ट्‌विटसोबत ‘वॉर्निंग लेबल’ लावली आहेत. ट्रम्प आगामी निवडणूकीसाठी सोशल मीडियाचा वापर करत असल्याचे सांगत ट्‌विटरने प्रथमच असे पाऊल उचलले आहे. मेल इन बॅलेट्‌समुळे मतदारांची फसवणूक होऊ नये, यासाठी हे पाउल उचलल्याचे ट्‌विटरने म्हटले आहे.

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये ट्विटर हस्तक्षेप करत असून त्याने भाषण स्वातंत्र्याची ‘मुस्कटदाबी’ केली आहे, असा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. मात्र, ट्रम्प यांचा आरोप ‘दिशाभूल’ करणारा असून अशा ‘मेल बॉक्‍सची चोरी होऊ शकते’, असे ट्विटरने म्हटले आहे. दरम्यान, सोशल मीडिया नेटवर्कने तथ्य तपासणीचा इशारा दिल्यानंतर अशाप्रकारचे ट्‌विट प्रथमच समोर आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

निवडणुकीसाठी सोशल मीडियाचा वापर होत असल्याचे आरोप-प्रत्यारोप कायमच सुरू असतात. तसेच त्याचा गैरवापरही होतो. त्यामुळे आता सर्वच सोशल मीडिया कंपन्यांनी तथ्य तपासणीसाठी नवी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. त्यानुसार ट्विटरने ‘चेक वार्निंग लिंक’ सुरू केली आहे. त्यानुसार ट्रम्प यांनी केलेल्या एका ट्विटला ट्विटरने ‘फॅक्‍ट चेक’ची लिंक लावली आहे. त्यामुळे संतापलेल्या ट्रम्प यांनी हे आरोप केले आहेत. ट्रम्प म्हणाले, ‘‘माझ्या विधानाला ‘फॅक्‍ट चेकिंगची िंलंक’ लावून ट्विटर निवडणुकीत हस्तक्षेप करत आहे. त्यामुळे भाषण स्वातंत्र्याची मुस्कटदाबी होत आहे. अध्यक्ष म्हणून मी कदापि घडू देणार नाही.’’

थायलंड : उंदरांवरील चाचणी सकारात्मक, आता टाकले पुढचे पाऊल

ट्रम्प यांच्या ट्विटनंतर ट्विटरने त्वरीत त्याबरोबर एक ‘मेल इन बॅलट्‌स’ अशी लिंक जोडली आहे. त्यातून तथ्य जाणून घ्या, असे म्हटले आहे. सीएनन आणि वॉशिंग्टन पोस्टच्या हवाल्याने ही लिंक देण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्‌विटरवर कायमच सक्रीय असतात. अनेक लहान-मोठ्या घोषणा किंवा अन्य देशांवर आरोप-प्रत्यारोप करताना ते ट्‌विटरचा आधार घेतात. मात्र, त्यांनी केलेल्या एका ट्‌विटलाच अशाप्रकारे, ‘फॅक्‍ट चेकची लिंक’ लावली गेल्याने ते संतप्त झाले आहेत. 

जगभरातील चिमुरड्यांचा जीव धोक्यात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: disturbance in donald trump and twitter