सीनियर बुश यांचा 'व्हेंटिलेटर' काढण्याचा डॉक्टरांचा विचार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

होस्टन- अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज एच.डब्लू. बुश (सीनियर) यांची प्रकृती अत्यवस्थ असून, त्यांच्या श्वासोच्छवासासाठी लावण्यात आलेली 'ब्रीदिंग ट्युब' काढून टाकण्याचा विचार त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर करीत आहेत. 

होस्टन- अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज एच.डब्लू. बुश (सीनियर) यांची प्रकृती अत्यवस्थ असून, त्यांच्या श्वासोच्छवासासाठी लावण्यात आलेली 'ब्रीदिंग ट्युब' काढून टाकण्याचा विचार त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर करीत आहेत. 

बुश यांनी अमेरिकेचे 41वे अध्यक्षपद भूषविले आहे. 92 वर्षीय बुश आणि त्यांच्या 91 वर्षीय पत्नी बार्बरा या दोघांनाही होस्टन मेथडिस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 
बुश यांना न्युमोनिया झाला आहे, तर त्यांच्या पत्नी बार्बरा यांच्या फुफ्फुसात बिघाड झाल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यांना ब्राँकाइटीस झाल्याचे निदान झाले असून, त्यांची प्रकृती आता सुधारली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

बुश यांना श्वासोच्छवासाचा त्रास होत असल्याने शनिवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तत्पूर्वी, त्यांच्या पत्नी बार्बरा यांना गेल्या काही दिवसांपासून कफाचा त्रास झाल्याने बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

बुश कुटुंबीयांचे प्रवक्ते जिम मॅकग्रा यांनी सांगितले की, "बुश यांची प्रकृती आता स्थिर असून, ते बुधवारपासून अतिदक्षता विभागात आहेत. श्वासोच्छासाठी त्यांना व्हेंटिलेटरचा आधार घ्यावा लागत आहे. व्हेंटिलेटर काढल्याने बुश यांना स्वतः श्वास घेता येऊ शकेल."
 

Web Title: Doctors consider removing George HW Bush's breathing tube