पिझ्झा द्यायला येणार रेनडिअर..

वृत्तसंस्था
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

इशिकारी (जपान) - येथे नुकतीच हिमवृष्टीला सुरुवात झाली असून, त्यामुळे वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली आहे. आशा वातावरणात पिझ्झा प्रेमींना त्रास होऊ नये यासाठी 'डॉमिनोज कंपनी जपान' पिझ्झा डिलिव्हरीसाठी वेगळीच पद्धत अवलंबणार आहे. बर्फामध्ये पिझ्झा डिलिव्हरीला अडथळा येऊ नये यासाठी कंपनी आता रेनडिअरचा वापर करणार असून, त्यावर संशोधन सुरु आहे.

यामध्ये पिझ्झा डिलिव्हरीसाठी लागणारा वेळ, रेनडिअर रायडर्स (चालक), रेनडिअर ट्रॅकिंग सिस्टीम या सगळ्याचा विचार करण्यात येणार असून, त्यावर काम सुरु असल्याचे कंपनीने म्हटले आहे. जीपीएसच्या माध्यमाने रेनडिअरला ट्रॅक करण्याची सिस्टीम यामध्ये तयार करण्यात येणार असल्याची माहिती एका व्हिडिओद्वारे कंपनीने दिली आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, रेनडिअरच्या सुरक्षेचा विचार देखील करण्यात येणार असून, कोणत्याही चालकावीना रेनडिअर लांबचा पल्ला गाठू शकेल का..? यावर देखील विचार सुरु आहे.

Web Title: Domino's testing out pizza delivery by reindeer in Japan

व्हिडीओ गॅलरी