डोनाल्ड ट्रम्प अधिकृतरित्या रिंगणात; रिपब्लिकन पक्षातर्फे उमेदवारी जाहीर

पीटीआय
Wednesday, 26 August 2020

रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेत अपेक्षेनुसार डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले. यामुळे ट्रम्प हे सलग दुसऱ्यांदा अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविणार आहेत.

वॉशिंग्टन -अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (वय ७४) यांची रिपब्लिकन पक्षाने आगामी अध्यक्षीय निवडणुकीतील पक्षाचे उमेदवार म्हणून आज अधिकृतरित्या निवड केली. त्यांचा सामना आता डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन (वय ७७) यांच्याबरोबर होणार आहे.  ट्रम्प यांनी उपाध्यक्षपदासाठी विद्यमान उपाध्यक्ष माइक पेन्स यांचीच निवड केली आहे. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेत अपेक्षेनुसार डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले. यामुळे ट्रम्प हे सलग दुसऱ्यांदा अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविणार आहेत. ते २७ तारखेला उमेदवारी स्वीकृतीचे भाषण करतील. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे चार वर्षातून एकदा होणारी रिपब्लिकन पक्षाची  राष्ट्रीय परिषद यंदा व्हर्च्युअल पद्धतीने झाली.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भारताचे आभार
अमेरिकेच्या विनंतीवरून भारताने त्यांच्या ताब्यात असलेल्या अमेरिकी धर्मोपदेशकाला सोडून दिल्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे आभार मानले. ब्रायन नेरन असे या धर्मोपदेशकाचे नाव असून त्याच्याकडे बेहिशेबी ४० हजार अमेरिकी डॉलर आढळले होते. ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्यावर मे महिन्यात त्याला सोडून दिले होते.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Donald Trump announced the nomination of the Republican Party