व्हाईट हाऊसच्या बाहेर गोळीबार; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प सुरक्षित ठिकाणी

Donald Trump Briefly Evacuated During Presser After Shooting Outside White House
Donald Trump Briefly Evacuated During Presser After Shooting Outside White House

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे निवासस्थान असलेल्या व्हाइट हाउस (White House) बाहेर गोळीबार झाला असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. गोळीबार झाला त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प एका पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः या घटनेची माहिती पत्रकरांना दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

आता व्हाईट हाऊस बाहेरील परिस्थिती नियंत्रणात असून सिक्रेट सर्विसच्या अधिकाऱ्यांकडून तात्काळ कारवाई करण्यात आली आहे. सिक्रेट सर्विसच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला गोळी लागली असून त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्याने एकच गोळी चालवली असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'व्हाइट हाउसच्या बाहेर गोळीबार झाला असून आता परिस्थिति नियंत्रणात आहे. सिक्रेट सर्विसच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तात्काळ कारवाईबद्दल मी त्यांना धन्यवाद देत असल्याचेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. एका व्यक्तीला रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्या व्यक्तिला सिक्रेट सर्विसच्या अधिकाऱ्यांकडून गोळी लागली असल्याची शक्यता आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, सिक्रेट सर्विसच्या लोकांनी पत्रकार परिषद चालू झाल्यानंतर काही वेळातच राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षा स्थळी हलविण्यात आले. परंतु, काही वेळानंतर पत्रकार परिषदेच्या ठिकाणी ट्रम्प वापस आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com