ट्रम्प यांनी केली पाकची हटाई; म्हणाले, कुठून आणलंय या पत्रकाराला?

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

ट्रम्प यांनी खान यांच्याकडे बघून 'अशा पत्रकारांना कुठून आणता?' असा सवाल केला. त्यावर इम्रान निरूत्तर झाले व सगळ्यांसमोर त्यांची खिल्ली उडाली. 

वॉशिंग्टन : आतापर्यंत पाकिस्तानचे मंत्री व नेते भडकाऊ विधान करताना दिसत होते; आता मात्र तेथील पत्रकारही भारताविरोधात भडकाऊ विधान करताहेत. अमेरिकेतील बैठकीत याच संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर पाकिस्तानी पत्रकाराची ट्रम्प यांनी खिल्ली उडवली. भर पत्रकार परिषदेत असे झाल्याने पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरही ट्रम्प यांनी निशाणा साधला.

#HowDareYou 16 वर्षीय ग्रेटा जगातील नेत्यांवर संतापली, म्हणाली....

अमेरिकेत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान व अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची बैठक झाली. यानंतर ते दोघे पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी पाकिस्तानी पत्रकार वारंवार ट्रम्प यांना भारत-काश्मीर आणि पाकिस्तानबद्दल प्रश्न विचारत होता. ट्रम्प यांनी उत्तर देऊनही त्याचे यासंदर्भात प्रश्न विचारणे सुरूच होते. यावर ट्रम्प यांनी त्या पत्रकाराला सवाल केला की, तुम्ही पाकिस्तानी शिष्टमंडळाचे सजस्य आहात का, तुम्ही जे बोलताय ते तुमचे विचार आहेत. हे प्रश्न नाही, तर तुमची मतं आहेत. यानंतर ट्रम्प यांनी खान यांच्याकडे बघून 'अशा पत्रकारांना कुठून आणता?' असा सवाल केला. त्यावर इम्रान निरूत्तर झाले व सगळ्यांसमोर त्यांची खिल्ली उडाली. 

 imran khan

युतीचे जागावाटप भारत-पाक फाळणीपेक्षा भयंकर : संजय राऊत

ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'हाऊडी मोदी' कार्यक्रमाचेही कौतुक केले. मोदींनी नाव न घेता पाकिस्तान कसे षड्यंत्र रचतो हे अखंड 50 हजार लोकांसमोर आक्रमकपणे सांगितले. तसेच भारत व पाकिस्तानने काश्मीर प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढावा. बोलण्याने कोणत्याही समस्येतून मार्ग निघू शकतो, असे त्यांनी यावेळी सांगितले.  
   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Donald trump criticizes Pakistani journalist at Washington