डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ‘मानवी हक्क’चे ताशेरे

Donald-Trump
Donald-Trump

न्यूयॉर्क - जॉर्ज फ्लॉईडच्या मृत्यूनंतर उसळलेल्या आंदोलनाला प्रत्यूत्तर देताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वापरलेल्या भाषेवर संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क संस्थेने ताशेरे ओढले आहेत. थेट गतकाळातील वांशिक विघटनवाद्यांसारखी ही भाषा आहे असे परखड मत नोंदविले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मिनियापोलिसमध्ये फ्लॉईडचा बळी गेल्यानंतर देशभऱ वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे लोक एकत्र येऊन न्यायासाठी व आंदोलकांसाठी आवाज उठवित आहेत. ट्रम्प यांनी याविषयी आक्रमक वक्तव्ये कायम ठेवली आहेत. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र मानवी हक्क मंडळासाठी विशेष प्रक्रिया असे नाव असलेल्या संस्थेच्या साठपेक्षा जास्त स्वतंत्र तज्ञांनी एक निवेदन जारी केले.

त्यात म्हटले आहे की, आपल्या देशाच्या भुतकाळात वांशिक विघटनवाद्यांनी कृष्णवर्णीयांना मुलभूत हक्क नाकारण्यासाठी कसून प्रयत्न केले. आपल्या अध्यक्षांचा आंदोलन मोडून काढण्यासाठी वेगवेगळ्या टप्यातील प्रतिसाद म्हणजे सरकारकडून आणखी हिंसाचाराची धमकीच आहे. यामुळे आम्हाला गंभीर चिंता वाटते. देश लष्करी कारवाईच्या उंबरठ्यावर उभा राहिला आहे. पूर्वी ज्या सामाजिक अन्यायामुळे लोकांना रस्त्यावर यावे लागले त्या कटू भुतकाळाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com