'खूप, खूप चांगली बैठक झाली'; ट्रम्प-किम यांची ऐतिहासिक भेट

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 जून 2018

ट्रम्प आणि किम यांच्या भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. आज सकाळी सुमारे 50 मिनिटे या दोघांमध्ये चर्चा झाली. या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी एकत्र बाहेर येत माध्यमांना अभिवादन केले. या भेटीनंतर किम जोंग म्हणाले, की सिंगापूरमध्ये जे काही होत आहे, यावर जगातील अनेकजण विश्वास ठेवणार नाहीत. अनेकांना वाटत असेल की ही भेट सायन्स फिक्शन चित्रपटाप्रमाणे आहे. तर, ट्रम्प म्हणाले, की
मला विश्वास आहे दोन्ही देशांमधील संबंध चांगले होतील. अनेक आव्हाने पार करून आमची भेट झाली आहे. ही भेट होणे सोपे नव्हते. या भेटीनंतर सहज असा कोणताही निर्णय होणार नाही. आमच्यात खूप, खूप चांगली बैठक झाली.

सिंगापूर : उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन आणि अमेरिकचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये आज (मंगळवार) सकाळी सिंगापूरमध्ये ऐतिहासिक भेट झाली. तब्बल 50 मिनिटे चाललेल्या या बैठकीत दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध प्रस्थापित होतील यावर चर्चा झाली. या बैठकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते.
 
या बैठकीसाठी दोन्ही नेते सोमवारीच येथे दाखल झाले होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी सिंगापूरचे पंतप्रधान ली सेन लुंग यांची औपचारिक भेट घेतली होती. किम यांच्याबरोबरील भेट सकारात्मक होईल, अशी आशा ट्रम्प यांनी या वेळी व्यक्त केली होती. ट्रम्प यांच्याबरोबर परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन आणि इतर काही वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. किम हेदेखील आपल्या अधिकाऱ्यांचा ताफा घेऊन येथे आले आहेत. उत्तर कोरिया आणि अमेरिका या दोन्ही देशांबरोबर राजनैतिक संबंध असलेल्या काही निवडक देशांपैकी सिंगापूर आहे.
 
ट्रम्प आणि किम यांच्या भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. आज सकाळी सुमारे 50 मिनिटे या दोघांमध्ये चर्चा झाली. या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी एकत्र बाहेर येत माध्यमांना अभिवादन केले. या भेटीनंतर किम जोंग म्हणाले, की सिंगापूरमध्ये जे काही होत आहे, यावर जगातील अनेकजण विश्वास ठेवणार नाहीत. अनेकांना वाटत असेल की ही भेट सायन्स फिक्शन चित्रपटाप्रमाणे आहे. तर, ट्रम्प म्हणाले, की
मला विश्वास आहे दोन्ही देशांमधील संबंध चांगले होतील. अनेक आव्हाने पार करून आमची भेट झाली आहे. ही भेट होणे सोपे नव्हते. या भेटीनंतर सहज असा कोणताही निर्णय होणार नाही. आमच्यात खूप, खूप चांगली बैठक झाली.

चीनची भूमिका 
उत्तर कोरियाचा चीन हा एकमेव दीर्घकालीन मित्र आहे. अमेरिकेबरोबरील वादात चीनने कायमच किम यांची पाठराखण केली आहे. चीन आणि अमेरिकेचे शत्रुत्वही जगजाहीर आहे. या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी होणाऱ्या बैठकीमध्ये चीनची भूमिका काय असेल, याबाबत तर्कवितर्क काढले जात आहेत. डोनाल्ड ट्रम्प हेदेखील या मुद्यावरूनच चिंतीत आहेत. किम आणि ट्रम्प यांच्यातील चर्चेचे यशापयशही चीनवरच अवलंबून असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

Web Title: Donald Trump Kim Jong Un shake hands in a historic Singapore Summit