PM मोदींच्या पावलावर पाउल टाकत आता ट्रम्पही देणार चीनला दणका

सुशांत जाधव
Saturday, 1 August 2020

आम्ही TikTok App वर नजर ठेऊन आहोत. या अ‍ॅपवर बंदी घालण्यासंदर्भातही आम्ही विचार करत आहोत. अ‍ॅपसंदर्भात नेमका काय निर्णय घ्यावा यासाठी आमच्याकडे अनेक पर्याय खुले आहेत, असे ट्रम्प यांनी निवेदनात म्हटले आहे.

वाशिंग्टन : चीनवर उघड नाराजी व्यक्त करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींप्रमाणेच चीनला दणका देणार आहेत. चिनी कंपनीच्या  TikTok App वर बंदी घालण्यासाठी ट्रम्प वेगवेगळ्या पर्यायाचा विचार करत असल्याचे वृत्त आहे. कोरोना विषाणूच्या जगभरातील प्रादुर्भावामुळे अमेरिकेला मोठा फटका बसला आहे. या विषाणूच्या फैलावानंतर चीन-अमेरिका यांच्यातील संबंध हे टोकाला गेले आहेत. ट्रम्प यांनी अनेकवेळा चीनवर थेट निशाणा साधल्याचेही पाहायला मिळाले आहे. ट्रम्प यांनी एका निवेदनातून भारताचे  पंतप्रधान मोदींप्रमाणे आपल्या देशातही TikTok App वर बंदी घालण्याचा विचार करत असल्याचे संकेत दिले.

देशी बनावटीचे ‘नमस्ते भारत’

आम्ही TikTok App वर नजर ठेऊन आहोत. या अ‍ॅपवर बंदी घालण्यासंदर्भातही आम्ही विचार करत आहोत. अ‍ॅपसंदर्भात नेमका काय निर्णय घ्यावा यासाठी आमच्याकडे अनेक पर्याय खुले आहेत, असे ट्रम्प यांनी निवेदनात म्हटले आहे.भारतानंतर आता अमेरिकेतही TikTok App रडारवर आहे. 25 सदस्यीय अमेरिकन काँग्रेस टीमने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे अ‍ॅपवर बंदी घालण्याची मागणी देखील केळी आहे. अमेरिकेतील नागरिकांचा माहिती सुरक्षित राहावी, या आधारावर आता तिथेही चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याची मागणी जोर धरत आहे. TikTok App च्या माध्यमातून उपलब्ध होणारा डेटा चिनी कम्युनिस्टांची ताकद वाढवण्यासाठी मदतगार असल्याचे अमेरिकन काँग्रेस टीमच्या सदस्यांच्या टीमने म्हटले होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप       

भारतात चिनी अ‍ॅपच्या बंदीचा धडाका सुरुच 
चिनी कंपन्यांच्या विरोधात भारत सरकारने आक्रमक भूमिका घेतली आहे. TikTok आणि Hello App यासारख्या 59 अ‍ॅपवर निर्बंध घातल्यानंतर भारताने चीनशी संबंधित असलेल्या कंपन्यांच्या आणखी 47 अ‍ॅपवर कारवाई केल्याचे पाहायला मिळाले होते. या अ‍ॅपमध्ये क्लोनिकल अ‍ॅप्सचा समावेश आहे. जे अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली होती त्यापैकी काही अ‍ॅप लाइट वर्जनमध्ये सुरुच होती. यावरही भारताकडून कारवाई करण्यात आली आहे. भारताप्रमाणेच आता अमेरिकाही चीनला दणका देण्याच्या तयारीत आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: donald trump on path of pm modi he will be ban chinese app tiktok