उत्तर कोरियाला उद्‌ध्वस्त करू : डोनाल्ड ट्रम्प

वृत्तसंस्था
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

चीन, रशियाचे मानले अभार 
आण्विक कार्यक्रम बंद करण्याशिवाय उत्तर कोरियाकसमोर आता कुठलाही पर्याय शिल्लक राहिलेला नाही, असे ट्रम्प म्हणाले. उत्तर कोरियावर कठोर निर्बंध लादण्याच्या प्रस्तावाला "यूएन'च्या सुरक्षा परिषदेने नुकतीच 15 विरुद्ध शून्य मतांनी मंजुरी दिली होती. या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी मदत केल्याबद्दल ट्रम्प यांनी चीन आणि रशियाचे आभार मानले. उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा असलेल्या नेत्याला एकटे पाडण्यासाठी जगभरातील सर्व देशांनी एकत्र येण्याची गरज असल्याचेही ट्रम्प म्हणाले. उत्तर कोरियामुळे फक्त अमेरिकेलाच नव्हे तर संपूर्ण जगाला धोका आहे, असा इशारा ट्रम्प यांनी दिला. 

न्यूयॉर्क : किम जोंग उन यांनी आपली चिथावणीखोर कृत्ये सुरूच ठेवली, तर उत्तर कोरियाला पूर्णपणे उद्‌ध्वस्त केले जाईल, असा गंभीर इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी "यूएन'मधील पहिल्याच भाषणात दिला. "रॉकेट मॅन' स्वतःची आणि उत्तर कोरियाची आत्महत्या घडवून आणण्याच्या मोहिमेवर निघाला आहे, अशा शब्दांत ट्रम्प यांनी किम जोंग उन यांची खिल्ली उडवली. तसेच अमेरिका फस्ट या धोरणावर आपण ठाम असल्याचेही ट्रम्प यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. 

संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) आमसभेला ट्रम्प यांनी आज पहिल्यांदाच संबोधित केले. या भाषणात ट्रम्प नेमके काय बोलणार याकडे जगभरातील नेत्यांचे लक्ष लागले होते. क्षेपणास्त्रे आणि अण्वस्त्रधारी गुन्हेगारांच्या टोळीमध्ये कुठल्याही देशाला रस नाही, असे ट्रम्प यांनी भाषणाच्या सुरवातीलाच स्पष्ट केले.

ट्रम्प म्हणाले, "अमेरिकेकडे प्रचंड सामर्थ असले तरी तितकाच संयमही आहे; मात्र स्वतःचे किंवा मित्रराष्ट्राचे संरक्षण करण्याची वेळ आली, तर उत्तर कोरियाला पूर्णपणे उद्‌ध्वस्त करण्याशिवाय आमच्यासमोर कुठलाही पर्याय शिल्लक उरणार नाही. रॉकेट मॅन (किम जोंग उन) स्वतःसह आपल्या देशाचीही आत्महत्या घडवून आणण्याच्या मोहिमेवर निघाला आहे. कुठल्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी अमेरिका सुसज्ज आणि सक्षम असली तरी आम्हाला आमची ताकद दाखविण्याची वेळ येऊ नये. "यूएन'चे कार्यही तेच आहे. त्यामुळे उत्तर कोरिया काय करते हे आता पाहावे लागेल.'' 

चीन, रशियाचे मानले अभार 
आण्विक कार्यक्रम बंद करण्याशिवाय उत्तर कोरियाकसमोर आता कुठलाही पर्याय शिल्लक राहिलेला नाही, असे ट्रम्प म्हणाले. उत्तर कोरियावर कठोर निर्बंध लादण्याच्या प्रस्तावाला "यूएन'च्या सुरक्षा परिषदेने नुकतीच 15 विरुद्ध शून्य मतांनी मंजुरी दिली होती. या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी मदत केल्याबद्दल ट्रम्प यांनी चीन आणि रशियाचे आभार मानले. उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा असलेल्या नेत्याला एकटे पाडण्यासाठी जगभरातील सर्व देशांनी एकत्र येण्याची गरज असल्याचेही ट्रम्प म्हणाले. उत्तर कोरियामुळे फक्त अमेरिकेलाच नव्हे तर संपूर्ण जगाला धोका आहे, असा इशारा ट्रम्प यांनी दिला. 

Web Title: Donald Trump: US would destroy North Korea if forced to defend itself