डोनाल्ड ट्रम्प यांचा उत्तर कोरियाला इशारा

वृत्तसंस्था
सोमवार, 3 एप्रिल 2017

पोटोमॅक फॉल्स (अमेरिका) : उत्तर कोरिया राबवित असलेल्या अणू कार्यक्रमाच्या विरोधात चीनने कठोर पावले उचलली नाहीत, तर उत्तर कोरियाच्या विरोधात कारवाई करण्यास अमेरिका सक्षम आहे, असे मत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केले.

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि ट्रम्प यांच्यात येत्या गुरुवारी आणि शुक्रवारी चर्चा होत आहे. या वेळी उत्तर कोरियाच्या अणू कार्यक्रमाबरोबरच इतरही अनेक मुद्यांवर चर्चा अपेक्षित आहे. त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचे आजचे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. 
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी वरील विधान केले आहे.

उत्तर कोरियाचा अणू कार्यक्रम, व्यापार आणि दक्षिण चिनी समुद्रातील वादग्रस्त बेटांच्या मालकी हक्कांवरून निर्माण झालेला वाद आदी मुद्यांवर जिनपिंग आणि ट्रम्प यांच्यात चर्चा होण्याची शक्‍यता आहे. ट्रम्प म्हणाले, ''उत्तर कोरियाच्या अणू कार्यक्रमाच्या विरोधात कारवाई करण्याबाबत बैठकीत चर्चा होईल. उत्तर कोरियावर चीनचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे चीनने उत्तर कोरियावर दबाव टाकायला हवा. मात्र, त्यांनी तसे केले नाही तर उत्तर कोरियाच्या विरोधात कारवाई करण्यास एकटी अमेरिका सक्षम आहे. उत्तर कोरियाप्रकरणी चीनने मदत केल्यास ते चीनसाठी फायद्याचे ठरेल, मात्र चीनने मदत न केल्यास त्यातून सर्वांचेच नुकसान होईल.'' 

जिनपिंग यांच्या आगामी अमेरिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रेक्‍स टिलरसन हे चीनमधील वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्‍त्याने दिली. 

चीनने हात झटकले 
चीनने मदत केली नाही तर उत्तर कोरियाच्या विरोधात अमेरिका स्वतंत्रपणे कारवाई करेल, असे ट्रम्प म्हणाले. नेमकी काय कारवाई करणार? या प्रश्नाला मात्र ट्रम्प यांनी उत्तर दिले नाही. अमेरिकी प्रशासनाने भूतकाळात केलेल्या चुका आम्ही करणार नाही. न सांगता कारवाई करू, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. शेजारी देश असलेल्या उत्तर कोरियाला चीनकडून आर्थिक आणि राजनैतिक मदत पुरवण्यात येते. मात्र, असे असले तरी उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जॉंग उन यांच्या सरकारवर आमचा तेवढा प्रभाव नाही, असे चीनकडून सांगण्यात येते.

Web Title: Donald Trump wanrs North Korea to stop nuclear program