अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी एचआर मॅकमास्टर

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी पदी लेफ्टनंट जनरल एचआर मॅकमास्टर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी पदी लेफ्टनंट जनरल एचआर मॅकमास्टर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रशियन राजदूताशी संपर्क केल्याची टीका झाल्याने ट्रम्प यांचे माजी सुरक्षा सल्लागार मायकेल फ्लिन यांना पदावरून हटविण्यात आले होते. ट्रम्प यांच्या प्रशासनात एक महिन्यापूर्वीच फ्लिन यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना ट्रम्प यांचा विश्‍वासू साथीदार मानण्यात येत होते. दरम्यान रशियन राजदूतांसोबत असलेल्या संबंधांबाबत पूर्ण माहिती देण्यात अपयशी ठरल्याचे सांगत फ्लिन यांनी राजीनामा दिला होता. नव्याने नियुक्त होत असलेले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एचआर मॅकमास्टर यांनी लष्कराचा इतिहास या विषयावर डॉक्‍टरेट मिळविली आहे. व्हिएतनामच्या युद्धात अमेरिकेचा सहभाग होता हा समज खोटा ठरविणाऱ्या "डिरीलिक्‍शन ऑफ ड्युटी' या पुस्तकाचे त्यांनी लेखन केले आहे. अमेरिकेच्या सल्लागारपदासाठीच्या स्पर्धेत मॅकमास्टर यांचे कोठेही नाव नव्हते.

"जनरल एचआर मॅकमास्टर हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होणार आहेत. ते प्रचंड हुशार असून त्यांना खूप मोठा अनुभव आहे. लष्करातील प्रत्येक जण त्यांचा आदर करतो', अशी धक्कादायक घोषणा ट्रम्प यांनी केल्याचे वृत्त फ्लोरिडातील एका वृत्तपत्राने दिले आहे. मागील आठवड्यातील शेवटच्या काही दिवस ट्रम्प हे फ्लोरिडात होते. तेथे त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदासाठीच्या काही उमेदवारांची भेट घेणार असल्याचे सांगितले होते. ते सोमवारी रात्री उशिरा वॉशिंग्टनला परतणार होते.

 

Web Title: Donald Trump's Cabinet: President names HR McMaster new national security advisor