काबूलवर ड्रोन हल्ला ही अमेरिकेची चूक

‘पेंटॅगॉन’च्या वरिष्ठ अधिकाऱ्याची कबुली; माफीही मागितली
Kabul Terror Attack
Kabul Terror Attackfile photo

वॉशिंग्टन: ‘इसिस- खोरासन (इसिस -के)च्या दहशतवाद्यांना लक्ष्य करीत अमेरिकी सैन्याने गेल्या महिन्यात काबूलमध्ये केलेला ड्रोन हल्ला ही मोठी चूक होती ,’ अशी कबुली अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालय असलेल्या ‘पेंटॅगॉन’ने शुक्रवारी (ता. १८) दिली. या चुकीसाठी त्यांनी माफीही मागितली.

Kabul Terror Attack
‘ड्रॅगन’चे सागरी सामर्थ्य वाढता वाढे

काबूलमध्ये अमेरिकेने २९ ऑगस्ट रोजी केलेल्या ड्रोन हल्ल्याच्या चौकशीतील निष्कर्षावर बोलताना त्यांच्या सैन्याच्या मध्यवर्ती विभागाचे कमांडर जनरल फ्रँक मॅकेन्झी यांनी ही मोठी चूक झाल्याचे स्पष्ट केले. या हल्ल्यात दहा निर्दोष नागरिक मारले गेले, याची कबुली देत माफीही मागितली.

मॅकेन्झी म्हणाले, ‘‘ड्रोन हल्ल्यात सात मुलांसह ज्या दहा निरपराधांचा मृत्यू झाला हे खरे आहे. मात्र ते ‘इसिस-के’शी संबंधित होते किंवा त्यांच्यापासून अमेरिकेला धोका होता, असे अजिबात नव्हते. मात्र काबूलमधील हमीद करझाइ आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘इसिस-के’ने केलेल्या आत्मघाती हल्ल्यात अमेरिकेचे १३ सैनिक व १०० पेक्षा जास्त नागरिक ठार झाले होते. तसेच गुप्तचरांच्या माहितीनुसार आणखी मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता होती.’’

मॅकेन्झी म्हणाले की, ड्रोन हल्ल्यात सात मुलांसह एक मदत करणारी व्यक्ती आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात ठार झालेली सर्वांत लहान मुलगी सुमाया फक्त दोन वर्षांची होती. सुरक्षा दलांनी त्यांच्या मोटारीमध्ये ज्या गोष्टी पाहिल्या ती स्फोटके नसून पाण्याचे कंटेनर होते, असे तपासात सांगण्यात आले आहे. ‘ही चूक होती आणि यासाठी मी मनापासून माफी मागतो. कमांडर म्हणून या हल्ल्यास आणि त्याच्या दुःखद परिणामांना सर्वस्वी मी जबाबदार आहे,’ असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com