लष्करी जवानांना संबोधित करताना राष्ट्रपतींवर हल्ला

वृत्तसंस्था
रविवार, 5 ऑगस्ट 2018

व्हेनेजुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो एका ड्रोन हल्ल्यात थोडक्यात बचावले. लष्करी जवानांना संबोधित करत असताना ही घटना घडली. त्यावेळी त्यांचे भाषणही लाईव्ह चालू होते.​

कराकस (व्हेनेजुएला)- व्हेनेजुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो एका ड्रोन हल्ल्यात थोडक्यात बचावले. लष्करी जवानांना संबोधित करत असताना ही घटना घडली. त्यावेळी त्यांचे भाषणही लाईव्ह चालू होते.

राजधानी कराकस येथे आपल्या लष्करी जवानांसमोर भाषण करत असताना राष्ट्रपतींवर हल्ल्याचा प्रयत्न झाला. मात्र, राष्ट्रपती या या हल्ल्यातून बचावले आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारची जखम या हल्ल्यात झालेली नाही. परंतु, सात सुरक्षारक्षक या घटनेत जखमी झाले आहेत.

हल्ल्यानंतर थोड्या वेळाने व्हेनेझुलेलाचे मंत्री जॉर्ज रोड्रिग्ज यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले आहे की, ड्रोनमध्ये स्फोटकं भरुन राष्ट्रपतींना लक्ष्य करण्याच्या दृष्टीनेच हा हल्ला करण्यात आला होता. हा हल्ला नेमका कोणी केला याबाबत अद्याप कोणतीही माहिती स्पष्ट नाही, मात्र राष्ट्रपतींवर झालेल्या या हल्ल्यासाठी विरोधी पक्षांच्या आंदोलकांवर जबाबदार धरण्यात येत आहे. या घटनेची सरकारकडून सखोल चौकशी सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Drone Attack On The President Of Venezuela