भारतीय बालिकेच्या शोधासाठी ड्रोनचा वापर 

वृत्तसंस्था
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

या घटनेला दहा दिवस होऊन गेले आहेत. तिचा सतत शोध घेण्यात येत असून, तिच्याबाबत आम्ही आशावादी आहोत. परंतु, वेळ हा आमचा शत्रू आहे, असे सार्जंट केविन पर्लिच यांनी सांगितले. शरीनच्या शोधासाठी पोलिस दल सर्वतोपरी प्रयत्न करत असून, सर्व शक्‍यता पडताळून पाहण्यात येत आहेत.

ह्युस्टन : गूढरीत्या गायब झालेल्या एक तीन वर्षीय भारतीय बालिकेच्या शोधासाठी टेक्‍सासचे पोलिस ड्रोनचा वापर करत आहेत. शरीन मॅथ्यूज या बालिकेला एका अमेरिकी दांपत्याने दत्तक घेतलेले आहे.

दूध पीत नाही म्हणून तिचे वडील वेस्ली मॅथ्यूज यांनी अकरा दिवसांपूर्वी सात ऑक्‍टोबरला पहाटे तीनच्या सुमारास शिक्षा म्हणून तिला घराबाहेर ठेवले होते. तेव्हापासून ती गायब झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी वेस्ली मॅथ्यूज यांना अटक केलेली आहे. 

या घटनेला दहा दिवस होऊन गेले आहेत. तिचा सतत शोध घेण्यात येत असून, तिच्याबाबत आम्ही आशावादी आहोत. परंतु, वेळ हा आमचा शत्रू आहे, असे सार्जंट केविन पर्लिच यांनी सांगितले. शरीनच्या शोधासाठी पोलिस दल सर्वतोपरी प्रयत्न करत असून, सर्व शक्‍यता पडताळून पाहण्यात येत आहेत. तिच्या शोधासाठी ड्रोनरबरोबरच गुप्तहेरांचेही सहकार्य घेण्यात येत आहे, असे पोलिसांनी सांगितले. 

दरम्यान, "मॅथ्यूज कुटुंबीयांनी खरे काय ते सांगावे, यासाठी चर्चमधील प्रिस्टकडून घरावर पाळत ठेवण्यात आली आहे. जोपर्यंत शरीन सापडत नाही तोपर्यंत त्यांच्यावर लक्ष ठेवेल जाईल,'' असे थॉमस अँबलेव्हली यांनी सांगितले. 

 

Web Title: Drones Used In Search For Missing Indian 3-Year-Old In US

टॅग्स