इंडोनेशिया हादरले; ६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

earthquake
earthquake
Summary

गेल्या महिन्यात १९ जानेवारीला इंडोनेशियात ५.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता.

जकार्ता - इंडोनेशियाला (Indonesia) पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसला आहे. युरोपियन मेडिटेरेनियन सिस्मॉलॉडिटकल सेंटरने दिलेल्या माहितीनुसार ६ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने (Earthquake) इंडोनेशिया हादरले. बुधवारी १२ वाजून ५५ मिनिटांनी इंडोनेशियातील केपुलावन बरात दया भागात भूकंप झाला. यामुळे त्सुनामी आल्याची कोणतीही नाहिती समोर आलेली नाही. तसंच जिवितहानीसुद्धा झालेली नाही. भूकंपाचे केंद्र १२७ किमी खोलवर होते.

earthquake
5 वर्षांपेक्षा कमी वयोगटाला लसीसाठी फायजरने मागितली परवानगी

गेल्या महिन्यात १९ जानेवारीला इंडोनेशियात ५.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला होता. भूकंपाचे धक्के अमाहाईच्या २१९ किमी पूर्वेला जाणवले होते. गेल्या महिन्यात इंडोनेशियातील प्रमुख बेट जावा इथं मोठा भूकंप आला होता. यामुळे राजधानी जकार्तामध्ये इमारत हादरली होती. न्यूझीलंडच्या बेटांवर २९ जानेवारीला भूकंपाचे धक्के बसले होते. ६.४ रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद झाली होती. पॅसिफिक महासागरात हा द्विपसमूह येतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com