
युएईच्या विविध भागांतील रहिवाशांनीही भूकंपाचे धक्के जाणवल्याचं सांगितलं.
अफगाणिस्ताननंतर इराणमध्ये 6.1 तीव्रतेचा भूकंप; 3 ठार, 8 जण जखमी
इराणमध्ये आज (शनिवार) रात्री 1.32 च्या सुमारास जोरदार भूकंप (Iran Earthquake) झाला. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.1 इतकी मोजण्यात आलीय. भूकंपानंतर सुमारे तीन जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय. यूएईमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
इराणच्या आखाती किनारपट्टीवरील होर्मोझगन प्रांतातील आपत्कालीन व्यवस्थापनाचे प्रमुख मेहरदाद हसनजादेह यांनी सांगितलं की, भूकंपात तीन जणांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत.
हेही वाचा: पुढील 2-3 दिवसांत संपूर्ण भारतात मान्सूनचा होणार वर्षाव; हवामान खात्याचा इशारा
UAE मध्येही भूकंपाचे धक्के
इराणी प्रसारमाध्यमांनी भूकंपाची तीव्रता 6.1 सांगितलीय. तर, युरोपियन भूमध्य भूकंप केंद्रानं (EMSC) याची तीव्रता 6.0 असल्याचं म्हटलंय. EMSC नं सांगितलं की, भूकंप 10 किमी (6.21 मैल) खोलीवर होता. युएईच्या विविध भागांतील रहिवाशांनीही भूकंपाचे धक्के जाणवल्याचं सांगितलं.
हेही वाचा: फडणवीस-शिंदे जोडी महाराष्ट्रात पुन्हा विकास घडवून आणेल : ज्योतिरादित्य सिंधिया
भूकंपामुळं अफगाणिस्तानात हाहाकार
22 जून रोजी अफगाणिस्तानमध्ये झालेल्या भूकंपानं प्रचंड हाहाकार माजवला होता. या भूकंपात 1000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, तर 1500 हून अधिक लोक जखमी झाले. भूकंपाचे हे धक्के पाकिस्तानातही जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.1 इतकी मोजण्यात आलीय.
Web Title: Earthquake In Iran Three People Were Killed Seismological Center Magnitude 61 Uae
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..