नेपाळला भूकंपाचा धक्का; जिवीतहानी नाही

वृत्तसंस्था
रविवार, 2 जुलै 2017

एप्रिल 2015 मध्ये 7.8 तीव्रतेच्या भूकंपाने नेपाळमध्ये मोठी हानी झाली होती. या भूकंपात सुमारे 9000 नागरिकांचा बळी गेला होता. तर, 22 हजारांहून अधिक जखमी झाले होते.

काठमांडू - नेपाळमधील रामेच्चप भागाला आज (रविवार) सकाळी भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाची तीव्रता कमी असल्याने कोठेही जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही.

भूगर्भशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेसातच्या सुमारास हा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता 4.9 इतकी मोजण्यात आली आहे. भूकंपाचा धक्का जाणवण्यास सुरू झाल्यानंतर नागरिक घराबाहेर पडले. भूकंपामुळे कोठेही जिवीत किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. फेब्रुवारीमध्ये काठमांडू भागाला दोन भूंकपाचे धक्के बसले होते. त्यानंतर आता नेपाळला भूकंपाचा धक्का बसला आहे.

एप्रिल 2015 मध्ये 7.8 तीव्रतेच्या भूकंपाने नेपाळमध्ये मोठी हानी झाली होती. या भूकंपात सुमारे 9000 नागरिकांचा बळी गेला होता. तर, 22 हजारांहून अधिक जखमी झाले होते.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
मुंबई: क्रिकेटच्या बॅटने केली भावाची हत्या
बलात्कार पीडित महिलेवर चौथ्यांदा ऍसिड हल्ला
गोमांसावरून हत्येप्रकरणी भाजप नेत्याला अटक​
चंद्रपूर: खासगी बसला अपघात, 20 जण जखमी​
दोनही हातांनी वाजलेली टाळी​
जमावाच्या हल्ल्यांनी राष्ट्रपती चिंतित​
महिला क्रिकेटमध्ये आज भारत-पाक लढत​
जोड नसलेला उदारमतवाद​
#स्पर्धापरीक्षा - गुरुत्वीय लहरीचा संशोधनात्मक प्रयोग​
मोदी-ट्रम्प भेटीचं फलित (श्रीराम पवार)​
शापित देवभूमीला शांततेची आस (किशोर जामकर)​

Web Title: Earthquake Measuring 4.9 on Richter Scale Hits Ramechhap in Nepal

टॅग्स