
Earthquake: जगभरात भुकंपाचे सत्र सुरुच; पापुआ न्यू गिनीसह शिजांगमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के
पापुआ न्यू गिनी आणि तिबेटमधील शिजांग शहरात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर दोन्ही भूकंपांची तीव्रता अनुक्रमे 7.3 आणि 4.2 इतकी मोजली गेली आहे. दोन्ही ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, रात्री, 1.12 च्या सुमारास शिजांगमध्ये धक्के जाणवले. त्यानंतर लोक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. मिळालेल्या माहितीनुसार, अद्याप कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही.
यापूर्वी पापुआ न्यू गिनीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.3 मोजली गेली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, रविवारी रात्री 11.34 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. सध्या घटनास्थळी झालेल्या नुकसानीची माहिती मिळालेली नाही.
याआधी रविवारी सकाळी ११ वाजता मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.6 इतकी नोंदवण्यात आली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) ने सांगितले की, पचमढीपासून 218 किमी अंतरावर भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपात कोणतीही हानी झालेली नाही.