म्यानमार, बांगलादेशमध्ये भूकंपाचे धक्के

वृत्तसंस्था
बुधवार, 4 जानेवारी 2017

ढाका : भारताच्या शेजारील देश असलेल्या म्यानमार आणि बांगलादेशमध्ये मध्यरात्री भूकंपाचे हादरे बसले. 

बांगलादेशात नऊ तासांमध्ये दुसऱ्यांदा हा धक्का बसला. बांगलादेशात इतर भागात आधी बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यामध्ये सिलहेत आणि सुनामगंज येथील काही घरांचे नुकसान, तसेच दोन जण मृत्युमखी पडले होते. 

म्यानमारमध्ये 5.1 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्क़ा बसला. भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी रात्री 12.19 वाजता झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू भूगर्भात 100 किलोमीटर खोल होता. इम्फाळपासून 185 किलोमीटर मनदलय या ठिकाणापासून 209 कि.मी., तर मालविक येथून 46कि.मी. अंतरावर हा भूकंप झाला. दरम्यान, या भूकंपामुळे अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे स्पष्ट अद्याप झालेले नाही.
 
Web Title: earthquake tremors in bangladesh, myanmar