तैवानमध्ये 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप; कोणत्याही नुकसानीचे वृत्त नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Earthquake

तैवानमध्ये 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप; कोणत्याही नुकसानीचे वृत्त नाही

Earthquake In Taiwan : तैवानच्या पूर्वेकडील किनारपट्टी असलेल्या तैपईमध्ये सोमवारी 6.1 तीव्रतेचा भूकंपाचे (Earthquake) धक्के बसले आहेत. दरम्यान, या धक्क्यानंतर अद्यापपर्यंत कोणत्याही मोठ्या नुकसानाचे किंवा जीवितहानीचे वृत्त समोर आलेले नाही. दरम्यान, या भूकांपाच्या धक्क्यांनंतर तैवानमध्येदेखील भूकंपाचे धक्के जाणवू शकतात, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे. (Taiwan Rattled 6.1 Magnitude Earthquake)

बसलेल्या भूकंपाची खोली जमिनीखाली 27.5 किमी (17.1 मैल) इतका होता. तर केंद्रबिंदू तैवानच्या पूर्व किनार्‍याजवळ असल्याचे सांगण्यात आले आहे. जो हुआलियन काउंटीचा किनारा आणि योनागुनीच्या दक्षिणेकडील जपानी बेटाच्या मध्यभागी होता, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.

हेही वाचा: नागपूर : झोपडपट्टीला भीषण आग, झोपड्या जळून खाक

2016 मध्ये दक्षिण तैवानमध्ये झालेल्या भूकंपात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता, तर 1999 मध्ये बसलेल्या 7.3 रिश्टर स्केलच्या भूकंपात 2,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

Web Title: Earthquake With Magnitude Of 61 Richter Scale Occurred Of Yonagun Japan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :EarthquakeTaiwan
go to top