Australia Fire : ऑस्ट्रेलियातील आगीमुळे न्यूझीलंडचं आकाश झालं पिवळं!

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 जानेवारी 2020

ऑस्ट्रेलियातील या आगीचा शेजारील देशावर म्हणजेच न्यूझीलंडवरही परिणाम झाल्याचे बघायला मिळत आहे.

सिडनी : ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स जंगलात लागलेल्या आगीने देशाचे मोठे नुसकान केले आहे. या आगीत आतापर्यंत 23 जणांना आपला जीव गमवावा लागला असून जवळपास 50 कोटींच्यावर प्राणी-पक्षी या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत. यामध्ये कोआल व कांगारूंची संख्या सर्वाधिक आहे. ऑस्ट्रेलियातील या आगीचा शेजारील देशावर म्हणजेच न्यूझीलंडवरही परिणाम झाल्याचे बघायला मिळत आहे.

#AustralianBushfire : शेन वॉर्न करतोय टोपीचा लिलाव; आगीतील पीडितांसाठी खेळाडू सरसावले!

Image result for australia fire

न्यू साऊथ वेल्स जंगलातील हा वणवा इतका भयंकर आहे की, त्या वणव्यामुळे तेथील आकाशाचा रंग बदलला आहे. ऑस्ट्रेलियासह न्यझीलंडमध्येही या वणव्याचा परिणाम झालाय. ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडच्या सीमेवर असलेले हे न्यू साऊथ वेल्स जंगल वणव्याने भरले आहे. त्यामुळे न्यूझीलंडमधील वातावरणही पूर्ण बदलून गेले आहे. येथील आकाशाचा रंग पिवळा धमक झाला असून धुळीचे साम्राज्य वाढले आहे. ऑस्ट्रेलियातील आगीचा धूर हा तब्बल आजूबाजूच्या 2000 किमी अंतरापर्यंत गेलाय. त्यामुळे सर्व परिसरच भगवा-पिवळा झालाय. तसेच वातावरणात धुराचे थर जमा झालेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Image result for australia fire

उच्च तापमानामुळे हा वणवा भडकल्याचे पर्यावरण तज्ञ्जांनी सांगितले आहे. साधारण या महिन्यांमध्ये तेथे वणवा पेटतो, पण तो इतका भयंकर नसतो. यावेळी लागलेल्या वणव्याने देशाचे प्रचंड नुकसान केले आहे. उच्च तापमान व जोराचे वारे यामुळे जमिनीची आर्द्रता कमी झाली व वणव्याला भडकत गेला. तसेच न्यू साऊथ वेल्स राज्यातील पर्यटनावर याचा फार मोठा परिणाम झाला आहे. या वणव्यामुळे परिसरातील तापमान तब्बल 107.4 सेल्सिअस डिग्रीपर्यंत पोहोचले आहे. 

वणव्यामुळे ऑस्ट्रेलियात आणीबाणी जाहीर

या भीषण वणव्यामुळे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी त्याचा आयोजित भारत दौरा रद्द केलाय. हा वणवा जागतिक वातावरणीय बदलांचा परिणाम आहे असे पर्यावरण अभ्यासकांनी म्हटलं आहे. आगीमुळे ऑस्ट्रेलियातली तापमानही वाढलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: effect of Australia fire on new zealand country