इजिप्तचे माजी अध्यक्ष मोहंमद मोर्सींची शिक्षा रद्द

पीटीआय
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

कैरो - इजिप्तच्या अपिलीय न्यायालयाने आज मुस्लिम ब्रदरहूडचे माजी अध्यक्ष मोहंमद मोर्सी यांची जन्मठेपेची शिक्षा रद्द केली आहे. त्यांच्याविरुद्ध पुन्हा सुनावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मोर्सी यांच्याविरुद्ध पॅलेस्टिनी गट हमाससाठी हेरगिरी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

अपिलीय न्यायालयाने गेल्या आठवड्यात आणखी एका प्रकरणात फाशीची शिक्षा रद्द केली होती आणि या प्रकरणाची पुन्हा सुनावणी करण्याचे आदेश दिले होते. मोर्सी हे लोकशाही मार्गाने निवडून आलेले अध्यक्ष होते, मात्र 2011 मध्ये बंडखोरीमुळे 2013 मध्ये अब्दुल फतेह अल सीसी याने त्यांना हटविले होते. अध्यक्षपदावरून हटविल्यानंतर त्यांना तुरुंगात टाकले होते आणि त्यांच्याविरुद्ध विविध खटले दाखल करून त्याची सुनावणी सुरू करण्यात आली होती.

Web Title: Egypt former President mohammed morsi punishment canceled