श्रीलंकेतील साखळी बॉंबस्फोटात आठ भारतीयांचा मृत्यू

श्रीलंकेतील साखळी बॉंबस्फोटात आठ भारतीयांचा मृत्यू

कोलंबो (पीटीआय) : श्रीलंकेत ईस्टर संडेच्या दिवशी झालेल्या साखळी बॉंबस्फोटांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 290 वर पोहोचली असून, 500 हून अधिक जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये आठ भारतीय नागरिकांचा समावेश असल्याचे भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज सांगितले.
 
आत्मघाती दहशतवाद्यांनी रविवारी तीन चर्च आणि तीन पंचतारांकित हॉटेलांना लक्ष्य करून बॉंबस्फोट घडवून आणले. त्यानंतर त्याच दिवशी कोलंबोत आणखी एक बॉंबस्फोट झाला. सोमवारी एका चर्चच्या जवळ उभ्या असलेल्या वाहनातील स्फोटकांचा स्फोट झाला. मात्र, त्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले. 

'त्या' चालकाला अटक 
तीन पंचतारांकित हॉटेलमधील बॉंबस्फोटांसाठीच्या स्फोटकांची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेल्या वाहनाच्या चालकाला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. कोलंबोतील पानादुरा या उपनगरामध्ये मागील तीन महिने आत्मघाती दहशतवाद्यांनी वास्तव्य केलेले घर शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. कोलंबोतील आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावर रविवारी रात्री शक्तिशाली स्फोटके आढळून आल्याची माहिती हवाई दलाकडून आज देण्यात आली. सहा फुटांच्या पाइपचा समावेश असलेला हा क्रूड बॉंब होता, तो निकामी करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.

जेडीएसचे चार कार्यकर्ते मृत्युमुखी 
बंगळूर : जनता दल- पुरोगामी (जेडीएस) पक्षाचे चार कार्यकर्ते श्रीलंकेतील बॉंबस्फोटांमध्ये मृत्युमुखी पडल्याची माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी आज दिली. कोलंबोतील बॉंबस्फोटांनंतर पर्यटनासाठी श्रीलंकेत गेलेले जेडीएसचे सात कार्यकर्ते बेपत्ता होते. त्यापैकी चार जण मृत्युमुखी पडल्याची माहिती मिळाली आहे. तीन कार्यकर्ते अद्यापही बेपत्ता आहेत, असे कुमारस्वामी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी आहेत. 

साखळी बॉंबस्फोटांनंतर 
- कोलंबोच्या मध्यवर्ती बसस्थानकात 87 बॉंब डिटोनेटर्स सापडले 
- स्फोटांमागे स्थानिक नॅशनल तौहिद जमात ही संघटना ः मंत्री रजिता सेनारत्ने यांची माहिती 
- कारवाईत 24 जणांना अटक, घातपातात सात आत्मघातकी दहशतवाद्यांचा समावेश 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com