फ्रान्समध्ये पुन्हा आठ हजार कोरोना रुग्ण

वृत्तसंस्था
Monday, 7 September 2020

 फ्रान्समधील कोरोना रुग्णांची संख्या सलग दुसऱ्या दिवशी आठ हजारहून जास्त झाली. शुक्रवारी आठ हजार 975 इतका आकडा होता, जो शनिवारी थोडा कमी झाला.

पॅरिस - फ्रान्समधील कोरोना रुग्णांची संख्या सलग दुसऱ्या दिवशी आठ हजारहून जास्त झाली. शुक्रवारी आठ हजार 975 इतका आकडा होता, जो शनिवारी थोडा कमी झाला. पण, आठ हजार 550 इतका नोंदला गेला. यात शुक्रवारचा आकडा विक्रमी ठरला. त्याआधी बुधवारी आणि गुरुवारी किमान सात हजार रुग्णांची नोंद झाली होती. एकूण रुग्ण तीन लाख 17 हजार 706, तर मृत 30 हजार 698 अशी आकडेवारी आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, संसर्ग वाढू लागल्यामुळे देशभरातील 22 शाळा बंद करण्यात आल्या. याच आठवड्याच्या प्रारंभी सुमारे एक कोटी 20 लाख विद्यार्थी शाळेत परतले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight thousand corona patients again in France

Tags
टॉपिकस
Topic Tags: